Dharmendra Social Media Post Viral: एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत सर्वांचे लक्ष वेधले. सध्या धर्मेंद्र यांच्याविषयी चाहते चिंता व्यक्त करत आहेत. कारण सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट ही थोडी वेगळी आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते एका झाडा खाली उभे असून अतिशय तरुण दिसत आहेत. पाठीमागे दोन अभिनेत्री दिसत आहेत. पण या अभिनेत्री कोण आहेत? हे स्पष्ट होत नाही. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी 'अच्छा तो हम चलते हैं' असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण कमेंट करत त्यांच्या प्रकृतीची विचारणा करत आहेत.
वाचा: इमरान हाश्मीने किसिंग सीन देणे का सोडले? स्वत: सांगितले कारण
यापूर्वी धर्मेंद्र यांनी स्वत:चा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते शिळी भाकरी खाताना दिसत होते. या फोटोत धर्मेंद्र अर्ध्यारात्री पलंगावर बसलेले आहे. त्यांचे केसही विस्कटलेले आहे आणि त्यांच्या हातात एक ताट असून, त्यात अर्धी पोळी लोणीसोबत ठेवलेली आहे. सोबतच त्यांच्या पायाला प्लास्टरही आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, "अर्धी रात्र झाली...झोप येत नाही..भूकही लागून जाते. मित्रांनो शिळ्या पोळीसोबत लोणी खूपच स्वादीष्ट लागते, हा हा" असे कॅप्शन दिले.
वाचा: ‘बघता बघता १० वर्ष झाली...’; ‘चला हवा येऊ द्या’ सोडल्यानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट!
अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या ८८ व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
धर्मेंद्र त्यांच्या कामासंबंधी बोलायचे झाले तर, अभिनेते 'अपने २' चित्रपटात दिसणार आहेत. याआधी त्यांनी 'तेरी बातो में उलझा जिया' या चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांचा अभिनयाचे फार कौतुक झाले. तसेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची भलतीच चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या