मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amala Paul: प्रसिद्ध अभिनेत्रीला केरळातील मंदिरात प्रवेश नाकारला; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Amala Paul: प्रसिद्ध अभिनेत्रीला केरळातील मंदिरात प्रवेश नाकारला; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Jan 18, 2023, 11:38 AM IST

    • Amala Paul: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे.
Amala Paul

Amala Paul: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे.

    • Amala Paul: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे.

Amala Paul: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात 'धार्मिक भेदभावामुळे' प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी तिला रोखले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमाला पॉल सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. परंतु, मंदिर प्रशासनाने प्रथेचा हवाला देत, या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंना दर्शन घेण्याची परवानगी असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

अभिनेत्री अमाला पॉलने मंदिराच्या रजिस्टरमध्ये लिहिले की, 'हे अतिशय दुःखद आणि निराशाजनक आहे की, २०२३मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी मंदिरात जाऊ शकले नाही. पण, दुरून दर्शन घेऊनही अनुभूती येत होती. मला आशा आहे की, धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ येईल जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे, तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल.’ सदर घटना उघडकीस आल्यापासून तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर प्रशासन चौकशीच्या कक्षेत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मंदिर अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीला सांगितले की, ते फक्त प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. अभिनेत्री अमाला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. अमला पॉल ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमालाने नागा चैतन्य, राम चरण, अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. अमला लवकरच अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटात दिसणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अजयचा हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत हिंदी रिमेक असून, अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. केवळ अभिनयच नाही तर, या चित्रपटाचे दिग्दर्शनही अजय देवगण सांभाळणार आहे. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

विभाग

पुढील बातम्या