मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alay Mazya Rashila : पुण्यात हाऊसफुल, तर अमेरिकेतही विशेष स्क्रीनिंग; मराठी चित्रपट सातासमुद्रापार!

Alay Mazya Rashila : पुण्यात हाऊसफुल, तर अमेरिकेतही विशेष स्क्रीनिंग; मराठी चित्रपट सातासमुद्रापार!

Feb 18, 2023, 02:49 PM IST

    • Alay Mazya Rashila : पुण्यामधील सिनेमागृहांमध्ये 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असताना आता अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळातर्फे या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे.
Alay Mazya Rashila

Alay Mazya Rashila : पुण्यामधील सिनेमागृहांमध्ये 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असताना आता अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळातर्फे या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे.

    • Alay Mazya Rashila : पुण्यामधील सिनेमागृहांमध्ये 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असताना आता अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळातर्फे या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे.

Alay Mazya Rashila : मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. या हटके प्रयोगांमुळेच मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक देखील वळू लागला आहे. ‘आलंय माझ्या राशीला' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटालाही प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. सगळ्या वयोगटाला हा चित्रपट चांगलाच भावतोय. राज्यातील अनेक चित्रपटगृहांतून 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळाली आहे. पुण्यामधील सर्वच सिनेमागृहांमध्ये 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचे सगळेच खेळ हाऊसफुल्ल होत असताना आता चक्क अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळातर्फे ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

याबाबत बोलताना चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर म्हणाले की, हा चित्रपट सर्वांना आवडतोय ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. दुसऱ्या आठवडयातही चित्रपटाची चांगली घोडदौड सुरू असून, प्रेक्षकांच्या आग्रहाखातर अनेक ठिकाणचे शो वाढवण्यात देखील आले आहेत. परदेशातही या चित्रपटाची खास मागणी असून अमेरिकेतल्या कोलोरॅडो मराठी मंडळाने या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले आहे. परदेशातल्या मराठी प्रेक्षकांना देखील या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्ये, सौंदर्य आहेत. या वैशिष्ट्यांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा चित्रपट म्हणजे ‘आलंय माझ्या राशीला.’ या चित्रपटात प्रत्येक राशीची एक वेगळी मजा मांडण्यात आली आहे. चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असलेला ‘आलंय माझ्या राशीला' प्रेक्षकांचा 'आनंद' द्विगुणित करण्यात यशस्वी ठरला आहे.

चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेशदेसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड प्रणव पिंपळकर आणि आनंद पिंपळकर यांच्या भूमिका आहेत.

पुढील बातम्या