मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aditya Singh Rajput: आदित्य सिंह राजपूतच्या शरीरावर जखमा; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

Aditya Singh Rajput: आदित्य सिंह राजपूतच्या शरीरावर जखमा; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

May 23, 2023, 09:10 AM IST

  • Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक जबाबानुसार, सोमवारी त्याच्या अंधेरी अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये घसरून पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

Aditya Singh Rajput

Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक जबाबानुसार, सोमवारी त्याच्या अंधेरी अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये घसरून पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

  • Aditya Singh Rajput Death: आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक जबाबानुसार, सोमवारी त्याच्या अंधेरी अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये घसरून पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

Aditya Singh Rajput Death: अभिनेता आदित्य सिंहराजपूतच्या निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आदित्य सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात पोलीस सातत्याने तपास करत आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूवर अनेक प्रकारचे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक जबाबानुसार, सोमवारी त्याच्या अंधेरी अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये घसरून पडल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, आता त्याच्या शरीरावर जखमा देखील आढळल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

आदित्य सिंह राजपूत याच्या कानावर आणि डोक्यावर जखमा दिसत आहेत. मात्र,या दोन्ही जखमा पडल्यामुळे देखील होऊ शकतात. आदित्य सिंह राजपूत त्याच्या दोन मित्रांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्यापैकी एक जण गेल्या अनेक दिवसांपासून स्वतःच्या घरी गेला होता. तर, त्याचा दुसरा मित्र सकाळी कामावर जाऊन रात्री उशिरा परत यायचा.या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांचे म्हणणे आहे की, आदित्य सिंह राजपूत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. अभिनेत्याला खोकला, सर्दी आणि उलट्या होत असल्याचे मोलकरणीने पोलिसांना सांगितले आहे. असे असूनही आदित्यने रविवारीही पार्टी केली होती.पण, त्या पार्टीत त्याने काही सेवन केले होते का? हे जाणून घेण्यासाठीपोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघितली जात आहे. गरज पडल्यास व्हिसेराचा नमुनाही घेतला जाणार आहे.

Suhana Khan: शाहरुख खानच्या लाडक्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? नक्की वाचा...

मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, आदित्य सिंहराजपूत सोमवारी सकाळी ११ वाजता उठला आणि त्याने नाश्त्यासाठी पराठा खाल्ला. मात्र, त्यानंतर त्याला सतत उलट्या होऊ लागल्या.त्यानंतर त्याने स्वयंपाकाला खिचडी बनवण्यास सांगितले. दुपारी २ ते २.३०च्या दरम्यान आदित्य सिंह राजपूत बाथरूममध्ये गेला. यानंतरघरातील नोकराने जोरात पडण्याचा आवाज ऐकून त्याला पाहण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी त्यालाआदित्य जमिनीवर पडलेला दिसला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

वॉचमनच्या म्हणण्यानुसार, घरातील मदतनीस खाली धावत आला आणि त्याने मदत मागितली. यानंतर त्याने वरच्या मजल्यावर जाऊन त्याला उचलले. बेशुद्ध झालेल्या त्याला पलंगावर झोपवले होते. बाथरूमच्या फरशाही तुटल्याचे चौकीदाराने सांगितले. आदित्यच्या एका मैत्रिणीने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर अभिनेत्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विभाग

पुढील बातम्या