मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘आई कुठे काय करते’मध्ये होणार आणखी एका अरुंधतीची एन्ट्री? ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

Viral Video: ‘आई कुठे काय करते’मध्ये होणार आणखी एका अरुंधतीची एन्ट्री? ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

Mar 01, 2023, 11:28 AM IST

  • Aai Kuthe Kay Karte Viral Video: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग दिसत आहे. यातच आता या मालिकेत आणखी एका अरुंधतीची एन्ट्री झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Viral Video:‘आई कुठे काय करते’ या मालिकेतअरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग दिसत आहे. यातच आता या मालिकेत आणखी एका अरुंधतीची एन्ट्री झाली आहे.

  • Aai Kuthe Kay Karte Viral Video: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग दिसत आहे. यातच आता या मालिकेत आणखी एका अरुंधतीची एन्ट्री झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte Viral Video:छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. सध्या या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग दिसत आहे. यातच आता या मालिकेत आणखी एका अरुंधतीची एन्ट्री झाली आहे. संगीत सोहळ्यात आईला खास सरप्राईज देण्यासाठी लेक ईशा हिने अरुंधतीचा गेटअप केला आहे. दोघींचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.चाहते देखील दोघींच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या मोठा गोंधळ होताना पाहायला मिळत आहे. सध्या देशमुखांच्या घरात अरुंधतीच्या लग्नाची गडबड सुरू आहे. मात्र, या लग्न सोहळ्यात सतत काहीना काही विघ्न येत आहेत. या सगळ्या संकटांना समोरं जात अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. यानंतर अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्नाच्या साड्या आणि दागिने देखील खरेदी केले. यानंतर आता त्यांचा संगीत सोहळा देखील पार पडला आहे.

अरुंधती आणि आशुतोष यांच्या संगीत सोहळ्यात सगळ्यांनीच भरपूर धमाल केली. या संगीत सोहळ्यात अरुंधतीच्या मुलांनी तिच्यासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. यावेळी अरुंधतीची लेक ईशा हिने आपल्या आईचा गेटअप केला होता. अरुंधती बनून तिने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजर खिळल्या होत्या. ‘ईशा’ साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर आता चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करत एका चाहतीने म्हटले की, ‘अगदी आरुंधतीची सावली वाटतेय ईशा. खूप गोड वाटलं पाहताना..’. तर, एकाने कमेंट करत लिहिले की, ‘अगदी सेम टु सेम दिसते अरुंधती ताई सारखी’. आणखी एका चाहतीने लिहिले की, ‘वाटते आहे हो ही आईची लाडकी लेक, आता त्या सिरीयलमध्ये लग्नाच्या वयाची झाली.’

पुढील बातम्या