मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi In Pune : पुण्यात आज राहुल गांधी यांची तोफ धडाडणार! महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी घेणार सभा

Rahul Gandhi In Pune : पुण्यात आज राहुल गांधी यांची तोफ धडाडणार! महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी घेणार सभा

May 03, 2024, 06:52 AM IST

    • Rahul Gandhi sabha In Pune Today : पुण्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पुण्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी ही सभा घेणार आहेत.
पुण्यात आज राहुल गांधी यांची तोफ धडाडणार! महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज सभा

Rahul Gandhi sabha In Pune Today : पुण्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पुण्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी ही सभा घेणार आहेत.

    • Rahul Gandhi sabha In Pune Today : पुण्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पुण्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी ही सभा घेणार आहेत.

पुणे : पुण्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पुण्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता आज काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची ही सभा पुण्यात होत आहे. आरटीओ ऑफिस शेजारी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) मैदानावर आज शुक्रवारी (३ मे) सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी टीका केली होती. या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची विदर्भात सभा झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दि. ७ मे या दिवशी होणार आहे. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या दि. १३ मे या दिवशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची सभा होणार आहे. सभेसाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ४० हजार जणांची सभेला उपस्थिती राहणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Palghar Lok Sabha : पालघरमधून डॉ. हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी; राजेंद्र गावितांचा पत्ता कट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर २९ एप्रिलला सभा झाली होती. या सभेत मोदी यांनी राहुल गांधी यांना 'शहजादा' म्हणत जोरदार टीका केली होती. दरम्यान, आज या टीकेला राहुल गांधी कसे उत्तर देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

lok sabha election : काँग्रेसने लडाखमधून सेरिंग नामग्याल यांना दिली उमेदवारी, भाजपने कापले होते तिकीट

पोलिसांचा चोख बंदोबस्त

आज आरटीओ ऑफिस शेजारी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) मैदानावर होणाऱ्या सभेसाठी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. या सभेसाठी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, भारतीय रक्षक आघाडीचे प्रमुख टेक्सास गायकवाड आदी या सभेसाठी तयारी करत आहेत.

देश अडचणीत सापडलेला आहे. भाजपने संविधान बदलण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे देशातील लोकशाही, संविधान टिकविण्यासाठी जनजागृतीची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी आयपीआय (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष यांनी पक्ष बाजुला ठेवून चळवळीत सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन कॉँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.

पुढील बातम्या