Maharashtra Weather Update : राज्यात मे महिन्यात सूर्य आग ओकणार आहे. पुढील काही दिवस राज्यात काही भागात तापमानात मोठी वाढ होणार आहे. तर काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४, ५, ६ मे दरम्यान, कोकणात आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी, सांगली, सोलापूर येथे ४ आणि ५ मे रोजी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ व ४ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यावर आज कुठलीही हवामान सिस्टीम कार्यरत नाही. महाराष्ट्र व गोवा राज्यात पुढील चारही दिवस म्हणजे ५ मे पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर ६ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उद्यापासून पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी येथे ४ मे रोजी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ व ४ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्रात सांगली व सोलापूर जिल्ह्यात ४ व ५ मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यात गेलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये ४ व ५ तारखेला लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड जिल्ह्यात ५ मे रोजी उष्णतेच्या लाटेसोबत संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर, जिल्ह्यात ४ व ५ तारखेला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर ६ मे रोजी चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश राहण्याची शक्यता आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सूर्य आग ओकत होता. तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. गुरुवारी तापमानात घट झाली. पुण्यात गुरुवारी तापमान हे ३९.१ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले.
मुंबईत उष्णतेची लाट कायम आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत तापमान हे ३५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहण्याची शक्यता आहे.