मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi On Sharad Pawar : माढ्याच्या पाणी प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांची शरद पवारांवर टीका; म्हणाले...'ते पुन्हा..'

PM Modi On Sharad Pawar : माढ्याच्या पाणी प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांची शरद पवारांवर टीका; म्हणाले...'ते पुन्हा..'

Apr 30, 2024, 02:21 PM IST

    • PM Modi Madha Malshiras Sabha: पंतप्रधान मोदींनी आज माळशिरसमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी, काँग्रेसवर घणाघाती टीका केली. माढ्याचा पाणी प्रश्न आणि ऊसाच्या दरावारुन मोदी यांनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
म्हाढयाच्या पाणी प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांची शरद पवारांवर टीका (PTI)

PM Modi Madha Malshiras Sabha: पंतप्रधान मोदींनी आज माळशिरसमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी, काँग्रेसवर घणाघाती टीका केली. माढ्याचा पाणी प्रश्न आणि ऊसाच्या दरावारुन मोदी यांनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

    • PM Modi Madha Malshiras Sabha: पंतप्रधान मोदींनी आज माळशिरसमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी, काँग्रेसवर घणाघाती टीका केली. माढ्याचा पाणी प्रश्न आणि ऊसाच्या दरावारुन मोदी यांनी आज पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

PM Modi On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मोदी यांची सोलापूर- धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी येथील मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि काँग्रेसवर टीका केली. माढ्याचा पाणी प्रश्न, ऊसाचे दर यारून मोदी यांनी आज पुन्हा शरद पवारांवर टीका केली. तर गेल्या ६० वर्षात काँग्रेसने जे केले नाही ते आम्ही या दहा वर्षात केल्याचे मोदी म्हणाले. केले हे भर सभेत सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट

Lok Sabha Election : अखिलेश यांच्या रॅलीत दगडफेक अन् खुर्चीफेक, कार्यकर्ते एकमेकांवर पडले, पोलिसांचा लाठीचार्ज

Lok Sabha Election : भांगेत कुंकू, हातात लाल चुडा अन् लाल ड्रेसमध्ये EVM घेऊन जाणारी ही सुंदर मतदान अधिकारी कोण?

Congress vs BJP: सायन येथील मतदान केंद्रात भाजप कार्यकर्त्याला मारहाण, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut : 'गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय'; संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

पंतप्रधान मोदी यांनी काल पुण्यात झालेल्या सभेत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे अतृप्त आत्मा म्हटले होते. आज मोदी यांनी माढ्याच्या पाणी प्रश्नावरून आणि उस दरावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, १५ वर्षीपूर्वी एक नेता येथे लढण्यासाठी आला. येथील दुष्काळ आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शपथ घेतली. माढ्याला पाणी देणार असल्याचे देखील त्यांनी संगितले होते. मात्र, आज देखील माढ्यात, मराठवाड्यात आणि विदर्भातील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. त्या बड्या नेत्याने आश्वासन देऊनही माढ्यात पाणी आजही आलेले नाही. या नेत्याने महाराष्ट्रातील नागरिकांना धोका दिला असून त्यानंतर या नेत्याने पुन्हा येथून लढण्याची हिम्मत केली नाही.

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

कृषीमंत्री असतानांही ऊसाला भाव मिळाला नाही

ऊसाच्या दारवरूनही शरद पावर यांचे नाव घेता मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले, राज्यातील एक नेता कृषीमंत्री असताना देखील ऊसाला भाव मिळाला नाही. ऊसाच्या भावसाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली. आमच्या काळात ऊसाचा एफआरपी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एफआरपी वाढावा म्हणून या नेत्याने जाणीव पूर्वक कधीच प्रयत्न केले नाही. हा नेता कृषीमंत्री असताना एफआरपी २०० रुपये होता. मात्र, आमच्या काळात एफआरपी हा ३५० रुपये करण्यात आला आहे.

इथलेच नेते कृषीमंत्री होते. असे असतांना त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या टॅक्स का माफ केला नाही? या बड्या नेत्याने कारखान्यांच्या टॅक्सचा प्रश्न सोडवला नाही. येथील नेते फक्त मोठ्या गप्पा मारतात. पण आज आमच्या काळात इथेनॉल उत्पादनात देश पुढे असून या इथेनॉलमुळे ७० हजार कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

पुढील बातम्या