मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  टीव्हीच्या पडद्यापासून निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत गाजत असलेली अश्विनी महांगडे नेमकी आहे कोण?

टीव्हीच्या पडद्यापासून निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत गाजत असलेली अश्विनी महांगडे नेमकी आहे कोण?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 30, 2024 01:10 PM IST

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथे झालेली सभा अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने गाजवली.

टीव्हीच्या पडद्यापासून निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत गाजत असलेली अश्विनी महांगडे नेमकी आहे कोण?
टीव्हीच्या पडद्यापासून निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत गाजत असलेली अश्विनी महांगडे नेमकी आहे कोण?

सध्या देशभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रचार सभा होताना दिसत आहेत. तर, काही कलाकार देखील प्रचार सभांमध्ये भाग घेताना दिसत आहेत. अशातच एका प्रचार सभेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना दिसली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी वाई इथे झालेली सभा अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने गाजवली. छोट्या पडद्यावरची ही लोकप्रिय अभिनेत्री आता राजकारणाच्या रिंगणातही गाजताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साताऱ्याचा विकास, मराठा आरक्षण यासह देशपातळीवरील प्रश्नांचाही आपल्या छोटेखानी भाषणात आढावा घेतला. देशावरील कर्ज, महागाई, भ्रष्टाचार याकडे तिने लक्ष वेधले. महिला खेळाडूंच्या बाबतीत जे राजकारण झाले, ते मनाला वेदना देणारे होतं, अशा भावना तिने व्यक्त केल्या. अश्विनीच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला. अश्विनी महांगडे हि केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर, एका सामाजिक कार्यकर्ती म्हणून देखील चर्चेत असते. अश्विनी महांगडे हिने तिच्या ‘रयतेच स्वराज्य’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. आजवर तिने अनेक संघर्ष करून इथवरचा टप्पा गाठला आहे. साताऱ्याच्या वाईमधून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता मनोरंजन विश्व ते निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे.

मेहंदीच्या सोहळ्यात लाईट्स गेल्या अन् लीला झाली गायब! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नवा ट्वीस्ट

अश्विनी महांगडेचा संघर्षमय प्रवास...

साताऱ्यातील वाईपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या पसरणी या गावात अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अश्विनी महांगडे हिला वडिलांकडूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. अश्विनीच्या वडिलांना अभिनयाची प्रचंड आवड होती. अश्विनीचे वडील म्हणजे तिचे नाना वाईमध्ये एका नाटकाच्या ग्रुपमध्ये काम देखील करायचे. घर, संसार आणि नोकरी सांभाळून अश्विनीच्या वडिलांनी अभिनयाची आवड जोपासली. वडिलांचे कष्ट बघत मोठ्या झालेल्या अश्विनीला ही अभिनयाची गोडी लागली होती. शाळेत असल्यापासून तिने मनोरंजन कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती.

चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

अश्विनीने आपलं बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. यांनतर तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं. आता पुढे काय करायचं या विचाराने ती मुंबईत आली. आत्याकडे कल्याणमध्ये राहून तिने नोकरीची शोधाशोध सुरू केली. यावेळी तिची अभिनयाची आवड देखील तिने जोपासली. डोंबिवलीमध्ये नोकरी करून ती वेगवेगळ्या ऑडिशनसाठी जायची. ऑडिशन देताना तिला स्वतःमधील अनेक कमतरता जाणवल्या. यांनतर तिने एका नाट्यशाळेत भाग घेतला आणि अभिनयाचे धडे गिरवले. हळूहळू तिला थोडंथोडं कामं मिळू लागलं. मग प्रवासाचा ताण कमी व्हावा म्हणून ती मिरारोडला मावशीकडे राहू लागली. या दरम्यान तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’सारखी नाटकं केली. या दरम्यानच्या काळात तिला ‘अस्मिता’ या मालिकेत ‘मनाली’ साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.

मालिका विश्वातील प्रवास...

‘अस्मिता’ या मालिकेनंतर अश्विनी महांगडे पुन्हा एका सशक्त भूमिकेच्या शोधात होती. परंतु, हवी तशी भूमिका मिळत नसल्याने तिने ब्रेक घेतला. काही वर्ष उलटल्यानंतर तिला ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी ऑडिशनला बोलावण्यात आले. संभाजीराजांची महिला गुप्तहेर असलेल्या एका व्यक्तिरेखेसाठी तिची ऑडिशन घेण्यात आली होती. मात्र, ही ऑडिशन झाल्यानंतर आठ दिवसांनी या भूमिकेसाठी दुसऱ्या मुलीची निवड झाल्याचे तिला कळले. त्यावेळी ती निराश झाली. मात्र, महिन्याभरानंतर पुन्हा याच मालिकेसाठी ‘लूकटेस्ट’ला बोलावण्यात आले. यावेळी संभाजी महाराजांच्या मोठ्या बहिणीची भूमिकेसाठी निवड झाल्याचे कळल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. या मालिकेत अश्विनीने साकारलेल्या ‘राणूआक्का’ला सगळ्यांकडूनच कौतुकाची थाप मिळाली. तिची ही भूमिका अजरामर झाली. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

IPL_Entry_Point