मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi : घाबरू नका, पळूही नका; रायबरेलीतून निवडणूक लढण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेवर नरेंद्र मोदी यांचा टोला

Narendra Modi : घाबरू नका, पळूही नका; रायबरेलीतून निवडणूक लढण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेवर नरेंद्र मोदी यांचा टोला

May 03, 2024, 03:02 PM IST

  • PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमेठीतून न लढता रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

घाबरू नका आणि पळू देखील नका; रायबरेलीतून निवडणूक लढवणाची घोषणा केल्यावर राहुल गांधींवर पंतप्रधानांची खोचक टीका

PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमेठीतून न लढता रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

  • PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमेठीतून न लढता रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने त्यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

PM Modi on Rahul Gandhi : काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी आज जाहीर झाली असून या बाबट काँग्रेसने ट्विटरवर माहिती दिली आहे. दोघेही आज आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी कॉँग्रेसच्या पारंपारिक जागेवरून न लढता रायबरेली येथून लढण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोदी यांनी सोनिया गांधी यांचे नाव न घेता यांच्यावरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हे पश्चिम बंगालच्या वर्धमान- दुर्गापूर येथे प्रचारसभा घेत असून तयांनी यावेळी गांधी घरण्यावर टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

Fake Vote: तुमच्या नावावर आधीच मतदान झालं, निवडणूक कर्मचाऱ्यांचं ऐकून मतदार शॉक; बोगस मतदानाचा व्हिडिओ समोर

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं मतदान; मतदानानंतर काय म्हणाले? वाचा

Lok Sabha Election 2024: उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता

EVM मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना पडणार महागात! निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हा

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानल्या जातात. या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा रिकामी झाली आहे. राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक न लढवता रायबरेलीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठी सोडल्याबद्दल भाजप पक्ष राहुल यांच्यावर हल्लाबोल करत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या उमेदवारीच्या घोसहनेनंतर पाहिल्यांना टीका केली आहे. पंतप्रधान म्हणाले, "मी आधीच सांगितले होते की वायनाडमधील पराभवाच्या भीतीने शेहजादे यांनी स्वतःसाठी दुसरी जागा शोधली आहे. त्यांना अमेठीतून पळ काढून रायबरेलीची जागा निवडावी लागली आहे. हे लोक तुम्हा लोकांना घाबरू नका असे सांगतात. मात्र, त्यांना मीच घाबरू नका लढा असे सांगतोय.

loksabha election : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्याकडून नोटीस; निवडणूक खर्चाचा ताळमेळ बसेना

पंतप्रधान पुढे म्हणाले, "यावेळी काँग्रेसच्या जागा पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहेत. आता देशाला हे देखील समजू लागले आहे की, हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी लढत नाहीत, ते केवळ देशाचे विभाजन करण्यासाठी निवडणु लढत आहेत."

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "बंगालमधील टीएमसी सरकारने हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले आहे. हे असे कोणते लोक आहेत की जय श्री रामचा नारा दिल्यावरी त्यांना राग येतो." मला टीएमसी सरकारला विचारायचे आहे की आमच्या दलित भगिनींवर एवढा मोठा अत्याचार झाला. आरोपीचे नाव शेख असल्याने टीएमसीने त्याला संरक्षण दिले.

सोनिया गांधी यांच्यावर टीका करतांना मोदी म्हणाले, निवडणुका लागायच्या दोन महिने आधीच मी सांगितलं होतं की, कॉँग्रेसचे बडे नेते निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाहीत. त्या घाबरून पळून जाणार आणि त्या पळून जाऊन राजस्थानात गेल्या. तसेच तेथून त्या राज्यसभेत दाखल झाल्या.

पुढील बातम्या