Bharat biotech on Covaxin : ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने ब्रिटीश न्यायालयात Covishield लसीचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात अशी कबुली दिल्यावर खळबळ उडाली आहे. यामुळे ही लस घेणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या वादावरून भारत बायोटेकने तयार केलेल्या भारतीय कोविड लस कोवॅक्सिनबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले असून या बाबत कंपनीने खुलासा केला आहे. भारत बायोटेकने तयार केलेली अँटी-कोविड-१९ लस कोवॅक्सिन ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोणत्याही दुष्परिणामांपासून मुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे निर्मित लस ही कोविशील्ड म्हणून ओळखली जाते. तर भारत बायोटेकने तयार केलेली लस ही कोवॅक्सिन म्हणून ओळखली जाते. बायोटेक कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर लक्ष केंद्रित करून कोवॅक्सिन ही लस विकसित करण्यात आले आहे.
'द डेली टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, ५१ फिर्यादींनी सादर केलेल्या सामूहिक याचिकेवर फेब्रुवारीमध्ये लंडनमधील उच्च न्यायालयात कायदेशीर कागदपत्र सादर करण्यात आले होते. कोविशिल्डलस तयार करणारी कंपनी AstraZeneca ने कबूल केले आहे की ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी विकसित केलेली लस कोविशिल्ड या लसीमुळे काही प्रमाणात घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर परिमाण होऊन रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि प्लेटलेटची संख्या देखील कमी होऊन हृदयविकरचा झटका देखील येऊ शकतो.
AstraZeneca Vaxzevria ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे देखील तयार केली गेली आहे. ही लस भारतात 'कोविशील्ड' म्हणून ओळखली जाते. ॲस्ट्राझेनेका लसीमुळे काही अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, रक्ताच्या गुठळ्या होऊंन प्लेटलेटची संख्या कमी करू शकते हे कंपनीने मान्य केले आहे. परंतु याचे अद्याप पुढे आलेले नाही. हा दुष्परिणाम होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे.
AstraZeneca म्हणजेच कोविशील्ड घेणाऱ्या फिर्यादींच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रक्त गोठणे आणि प्लेटलेटची कमतरता (TTS) असे एक दुर्मिळ लक्षण दिसून आले आहेत . हृदयविकाराचा झटका, मेंदूचे नुकसान, फुफ्फुसातील रक्त प्रवाह विस्कळीत होणे या सारखे अनेक मानवी शरीरावर परिणाम करणारे लक्षणे त्यांना आढळून आली आहे. यानंतर कोविशील्डबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.