Pyarali Nayani slams chitra wagh : अभिनेते प्याराली नयानी यांना पॉर्न स्टार म्हणून हिणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा नयानी यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं एक जाहिरात बनवली आहे. मोदींची भलामण करणाऱ्या एका जाहिरातीचं विडंबन ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातून करण्यात आलं आहे. 'वॉर रुकवा दी पापा' असं या जाहिरातीचं शीर्षक आहे. अभिनेते प्याराली नयानी यांनी या जाहिरातीत अभिनय केला आहे.
ही जाहिरात प्रसिद्ध होताच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नयानी हे पॉर्न स्टार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्याराली नयानी हे संतापले आहेत. प्याराली नयानी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आहे. चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Pyarali Nayani slams chitra wagh : अभिनेते प्याराली नयानी यांना पॉर्न स्टार म्हणून हिणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा नयानी यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं एक जाहिरात बनवली आहे. मोदींची भलामण करणाऱ्या एका जाहिरातीचं विडंबन ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातून करण्यात आलं आहे. 'वॉर रुकवा दी पापा' असं या जाहिरातीचं शीर्षक आहे. अभिनेते प्याराली नयानी यांनी या जाहिरातीत अभिनय केला आहे.
ही जाहिरात प्रसिद्ध होताच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नयानी हे पॉर्न स्टार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्याराली नयानी हे संतापले आहेत. प्याराली नयानी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली आहे. चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.|#+|
'भाजपच्या एक नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर पॉर्न स्टार असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी माझ्या एका वेबसीरिजच्या भूमिकेतील फोटो दाखवले. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. त्यांच्या या आरोपांमुळं माझी प्रतिमा मलिन झाली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी त्यांनी हे केलं आहे. त्यामुळं मला व माझ्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागत आहे, असं प्याराली नयानी म्हणाले.
'मी एक चरित्र अभिनेता आहे. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते, त्याप्रमाणं अभिनय करावा लागतो. चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. त्यामुळं त्यांना कदाचित हे माहीत असावं. येत्या दोन दिवसांत त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि जाहीर माफी मागावी, अन्यथा नाईलाजानं मला त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करावा लागेल, असं प्याराली नयानी यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मी कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा पाठीराखा नाही. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक भारतीय आहे. माझ्यासाठी देश सर्वात आधी आणि सर्व देशवासीय माझ्यासाठी सारखेच आहेत,’ असंही प्याराली नयानी यांनी स्पष्ट केलं.