मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Poll : मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान

Loksabha Poll : मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान

May 08, 2024, 07:12 AM IST

    • Loksabha Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ९३ मतदार संघासाठी मंगळवारी मतदान झाले. यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होता. या सर्व ठिकाणी एकूण ६१.४५ टक्के मंतदानाची नोंद झाली. राज्यात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले.
मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान (HT)

Loksabha Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ९३ मतदार संघासाठी मंगळवारी मतदान झाले. यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होता. या सर्व ठिकाणी एकूण ६१.४५ टक्के मंतदानाची नोंद झाली. राज्यात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले.

    • Loksabha Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ९३ मतदार संघासाठी मंगळवारी मतदान झाले. यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होता. या सर्व ठिकाणी एकूण ६१.४५ टक्के मंतदानाची नोंद झाली. राज्यात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले.

Loksabha Poll 2024 : देशात ११ राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेशातील ९३ मतदार संघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. एकूण ६१.४५ टक्के मंतदानाची नोंद झाली. राज्यात मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. देशात सर्वाधिक मतदान हे आसाम राज्यात झाले. तर महाराष्ट्रात ६१.४४ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तककयात मतदान कमी झाले असून हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनला समजणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

J P Nadda On Rss : भाजप आता सक्षम, आरएसएसची गरज नाही! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मोठा दावा

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

राज्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या आकडेवारीत घट झाली आहे. राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात ६१.४४ टक्के मतदान झाले. तर सर्वाधिक मतदानाची नोंद ही कोल्हापुरात झाली आहे. कोल्हापूरमध्ये ७०.३५ टक्के मतदान झाले. तर हातकणंगलेत ५६ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक कमी मतदान हे बारामतीमध्ये झाले आहे. बारामतीमध्ये ५६.७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

देशात सर्वाधिक मतदान आसाममध्ये

निवडणूक आयोगाने काल रात्री जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक मतदान झाले. या राज्यात ७५.२६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात ६१.४४ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, गुजरातमध्ये ५६.७६ टक्के, कर्नाटकमध्ये ६७.७६ टक्के, उत्तर प्रदेशात ५७.३४ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६३.०९ टक्के, तसेच पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाले, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के मतदान झाले.

Uddhav Thackeray : मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणाले ‘तुमचा बुरशी आलेला माल…’

मंगळवारी सकाळी ७ वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. उन्हामुळे अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले होते. यावेळी त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के, तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच ५२.७४ टक्के मतदानाची झाले होते.

बारामतीत मतदारांचा निरुत्साह

बारामतीतच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र, मतदारांनी मात्र मतदान केंद्रात पाठ फिरवली. २०१९ च्या तुलनेत जवळपास ९ टक्क्यांची घट झाली झाली आहे. असून 56.06 इतक्यावर ते घसरलं आहे. राज्यात लातूर येथे ६०.१८, सांगली येथे ६०.९५, बारामती येथे ५६.७, हातकणंगले येथे ६८.७, कोल्हापूर येथे ७०.३५, माढा येथे ६१.१७, उस्मानाबाद ६०.९१, रायगड ५८.१०, रत्नागिरी- सिंधुदुर्ग ५९.२३, सातारा ६३.५, सोलापूर ५७.६१ मतदानाची नोंद झाली.

पुढील बातम्या