मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : 'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Uddhav Thackeray : 'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Apr 23, 2024, 12:11 AM IST

  • Uddhav Thackeray On modi : मोदींनी सर्व उद्योग गुजरातला पळवल्याने आता त्यांना गुजरातला परत पाठवण्याची वेळ आली आहे. ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ अशी नरेंद्र मोदींची अवस्था आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला.

उध्दव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Uddhav Thackeray On modi : मोदींनी सर्व उद्योग गुजरातला पळवल्याने आता त्यांना गुजरातला परत पाठवण्याची वेळ आली आहे. ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ अशी नरेंद्र मोदींची अवस्था आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला.

  • Uddhav Thackeray On modi : मोदींनी सर्व उद्योग गुजरातला पळवल्याने आता त्यांना गुजरातला परत पाठवण्याची वेळ आली आहे. ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ अशी नरेंद्र मोदींची अवस्था आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी वर्ध्यातील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर खास ठाकरी शैलीत घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुखासाठी आम्ही दहा वर्षे झटलो आणि आमच्या पदरात धोंडे पडले असं म्हणत मोदी व भाजपवर घणाघात केला. नरेंद्र मोदींनी सर्व उद्योग गुजरातला पळवले आहेत. विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात येथे एकही मोठा उद्योग आला नाही. शेतकरी संकटात आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. मोदींनी सर्व उद्योग गुजरातला पळवल्याने आता त्यांना गुजरातला परत पाठवण्याची वेळ आली आहे. ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ अशी नरेंद्र मोदींची अवस्था आहे, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Congress vs BJP: सायन येथील मतदान केंद्रात भाजप कार्यकर्त्याला मारहाण, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Fake Voting : उत्तर प्रदेशमध्ये बोगस मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ; २५ मे रोजी होणार फेरमतदान

Thackeray Vs BJP : कुलाब्यात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी

Lok Sabha Election 2024 : मुंबईत सायंकाळी ६ वाजल्यानंतरही मतदान करता येणार! पण आहे एक अट..

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची संयुक्त सभा हिंगणघाटमध्ये पार पडली. यासभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.

मला किती खोके मिळाले असते?

उद्धव ठाकरे म्हणाले गद्दारांना ५० खोके मिळाले, मी त्यांच्याकडे गेलो असतो तर मला किती खोके मिळाले असते? पण मला खोके नको. माझी जनता माझं ऐश्वर्य आहे. त्यावर मोदी जीएसटी लावू शकत नाहीत. मात्र खूप वाईट पद्धतीने राजकारण केलं जात आहे.आजपर्यंत असं कोणीही केलं नव्हतं. तुम्ही ज्या गोष्टीला हिंदुत्व म्हणत आहातत्याला संपूर्ण जगात बदनाम केलं आहे.जगात देशाची बदनामी झाली असून जुलूमशाही सुरु आहे. घटना बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, हे आम्ही नाकर्त्यासारखं बघत बसणार नाही.

मुख्यमंत्रीपद काय बीसीसीआयचे अध्यक्षपद आहे का?

ते म्हणतात की, मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून मी भाजपशी युती तोडली. पण मुख्यमंत्री म्हणजे क्रिकेट कंट्रोल बार्डाचे अध्यक्षपद आहे का, असा टोला उद्धव यांनी अमित शहांना लगावला. शिवसेनेशी गद्दारी झाली. निवडणूक आयोगानेही मोदी, अमित शहा यांच्या दबावाखाली आमचे चिन्ह गद्दारांना दिले. ते म्हणतात, आमची नकली सेना आहे.

 

आता हीच सेना तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भाजपने तुरुंगात टाकले. आता ते संविधान बदलण्याची स्वप्ने पाहत आहेत, मात्र आम्ही त्यांचे स्वप्नपूर्ण होऊ देणार नाही, असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

पुढील बातम्या