मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Elections 2024: 'तुम्हालाही सहा भाऊ आहेत', पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा असदुद्दीन ओवैसींकडून समाचार

Lok Sabha Elections 2024: 'तुम्हालाही सहा भाऊ आहेत', पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा असदुद्दीन ओवैसींकडून समाचार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 22, 2024 09:11 PM IST

Asaduddin Owaisi On Narendra Modi : पंतप्रधान म्हणतात की, मुस्लिम अधिक मुले जन्माला घालतात व ते घुसखोर आहेत. मोदी लांब-लांब फेकत असतात. आमचा फर्टीलिटी रेट (प्रजनन दर) कमी झाला आहे. पंतप्रधान मोदींना सहा भाऊ आहेत, असे प्रत्युत्तर ओवैसी यांनी दिले आहे.

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा असदुद्दीन ओवैसींकडून समाचार
पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा असदुद्दीन ओवैसींकडून समाचार

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच हैदराबादचे खासदार व एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमधील डगरुआ येथे एआयएमआयएम प्रमुखांनी म्हटले की, काल पंतप्रधानांचे भाषण झाले. पंतप्रधान म्हणतात की, मुस्लिम अधिक मुले जन्माला घालतात व ते घुसखोर आहेत. मोदी लांब-लांब फेकत असतात. आमचा फर्टीलिटी रेट (प्रजनन दर) कमी झाला आहे. पंतप्रधान मोदींना सहा भाऊ आहेत. अमित शहा यांना अनेक भाऊ बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांना सात भाई आहेत. (Asaduddin Owaisi On Narendra Modi)

ट्रेंडिंग न्यूज

एमआयएम खासदार ओवैसी यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी आम्हाला घुसखोर कसे काय म्हणू शकतात? तुम्ही देश तोडण्याचा व कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी तुम्ही किती खोटे बोलणार? अमिरात व दुबईत जाऊन म्हणतात की,'या हबीबी'  (प्रिय संदर्भात) मात्र मोदी भारतातील मुस्लिमांना कमजोर रुपात पाहू इच्छितात.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, येथे एनडीएकडून मास्टर मुजाहिद आलम जदयूचे उमेदवार आहेत. जर ते जिंकले तर मोदीच्या इशाऱ्यावर नाचतील. तुम्ही त्यांना मत देऊ नका. २००२ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेथे दंगल झाली होती. आजही तेथे मुस्लिम असून ते घाबरलेले नाही. हा देश आमचाही आहे. आम्ही कोणाचे गुलाम नाही.

काय म्हणाले होते मोदी -

राजस्थानातील बांसवाडा येथे प्रचार सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवताना म्हटले की, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. म्हणजेच हे संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? हे अशांना वाटणार, ज्यांना अधिक मुलं आहेत. घुसखोरांना वाटणार. आपण मेहनतीने कमावलेला पैसा घुसखोरांना दिला जावा का? आपल्याला हे चालेल का?

WhatsApp channel