Rahul Gandhi: 'सूरत'वरून घमासान! राहुल गांधींचा संताप; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!-rahul gandhi slam pm narendra modi after bjp candidate mukesh dalal won unopposed from surat in gujarat ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi: 'सूरत'वरून घमासान! राहुल गांधींचा संताप; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

Rahul Gandhi: 'सूरत'वरून घमासान! राहुल गांधींचा संताप; म्हणाले, संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल!

Apr 22, 2024 07:29 PM IST

Rahul Gandhi : आपला नेता निवडण्याचा जनतेचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले आणखी एक पाऊल असल्याची टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली आहे.

 सूरतमधून भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा संताप
सूरतमधून भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा संताप

Rahul Gandhi on Surat Loksabha seat : गुजरातमधील सूरत मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल (bjp candidate Mukesh dalal) यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. यामुळे मतदानाआधीच सूरतमध्ये भाजपने खाते खोलले आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध घोषित केल्यानंतर अन्यसर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. मात्र याप्रकरणी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणे बाकी आहे. त्यात अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने मुकेश दलाल यांना विजयी घोषित केले आहे.

 

सूरतमध्ये भाजपच्या उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित केल्यामुळे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहूल गांधी म्हणाले की, हुकूमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे.

सोशल मीडिया एक्सवर एक पोस्टशेअरकरत राहुल गांधी यांनीभाजपवरकडाडून हल्ला केला आहे. राहुल गांधी म्हणाले,हुकुमशहाचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. आपला नेता निवडण्याचा जनतेचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले आणखी एक पाऊल आहे... मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार बनवणारी निवडणूक नाही तर देश वाचवण्याची निवडणूक आहे. संविधानाच्या रक्षणाची ही निवडणूक आहे.

सूरत मतदारसंघातून काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर इतर सर्व ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुकेश दलाल यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे.

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुकेश दलाल यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिले कमळ अर्पण केले. सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.सूरतमधून बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. आता गुजरातच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ ला सांगितले की, यशस्वी नामांकन असलेल्या आठ उमेदवारांनी आपली नामांकणे मागे घेतल्याने दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. बसपचे प्यारेलाल भारती हे सोमवारी अर्ज मागे घेणारे शेवटचे उमेदवार होते. दुपारी२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली उमेदवारी मागे घेताच दलाल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. सुरतमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार होते.

Whats_app_banner