मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Solapur Lok sabha : खळबळजनक! सांगोल्यात मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Solapur Lok sabha : खळबळजनक! सांगोल्यात मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

May 07, 2024, 06:00 PM IST

  • EVM Burntat Sangola : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मतदान करण्यासाठी केंद्रात आलेल्या तरुणाने ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ईव्हीएम खराब झाली असून फेरमतदान घेतलं जात आहे.

सांगोल्यात तरुणाने ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

EVM Burntat Sangola : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मतदान करण्यासाठी केंद्रात आलेल्या तरुणाने ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ईव्हीएम खराब झाली असून फेरमतदान घेतलं जात आहे.

  • EVM Burntat Sangola : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मतदान करण्यासाठी केंद्रात आलेल्या तरुणाने ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ईव्हीएम खराब झाली असून फेरमतदान घेतलं जात आहे.

solapur lok sabha constituency : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे.सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच (Lok sabha Election) राज्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. पहिल्या एक तासातच सोलापूर लोकसभेसाठी १२ टक्के तर माढा लोकसभेसाठी १० टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया सुरुळित सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एक खळबळजनक घटना घटली आहे. मतदानासाठी आलेल्या एका तरुणाने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगलीत पळापळ झाली.

ट्रेंडिंग न्यूज

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव दादासाहेब तळेकर आहे. या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त होत ईव्हीएम पेटवल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मतदान अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ईव्हीएम पूर्णपणे जळालं असून नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हासुरूकेली गेली.

ईव्हीएम जळाल्याने फेरमतदान सुरू -

घटनास्थळावरूनमिळालेल्या माहितीनुसार, बागलवाडी गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये (EVM) तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर तेथे ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाला. दादासाहेब तळेकर दुपारच्या सुमारास मतदानासाठी आला होता. त्यावेळी त्याने आपल्या खिशातून पेट्रोलची छोटी बाटली सोबत नेली होती. आत गेल्यानंतर त्याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकून त्याला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाले असून नवीन मशीन आणून या केंद्रावर फेरमतदान केले जात आहे. या गावात साधारण १३०० मते असल्याचं सांगितलं जात आहे. तेथे ५० ते ६० टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर हा प्रकार घडला.

या घटनेनंतर बागलवाडी येथे मतदान प्रक्रिया थोडा वेळ थांबवली होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यात लढत होत आहे.

 

मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव -

रायगड व कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे मतदान करण्यासाठी गेलेल्या दोन मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथे उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला तर कोल्हापूरमध्ये मतदान केंद्राबाहेरच ६१ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.

पुढील बातम्या