मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Dattatray Bharne:'लाज कशी वाटत नाही....' आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या! रोहित पवारांची आयोगाला तक्रार

Dattatray Bharne:'लाज कशी वाटत नाही....' आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या! रोहित पवारांची आयोगाला तक्रार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 07, 2024 02:53 PM IST

Dattatray Bharne viral Video : अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेयर केला आहे.

'लाज कशी वाटत नाही....' आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या! रोहित पवारांची आयोगाला तक्रार
'लाज कशी वाटत नाही....' आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या! रोहित पवारांची आयोगाला तक्रार

Dattatray Bharne viral Video : बारामती लोकसभा मतदार संघासाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीत काल रात्रीपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. रोहित पवार यांनी भोर वेल्हा येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा कार्यकर्त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेयर केला आहे. शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याने सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बारामती लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. या ठिकाणी मतदानाला जात असतांना इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी काही कार्यकर्त्यांना दमदाटी केली आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. इंदापूर येथील एका मतदान केंद्रावरचा हा व्हिडीओ असून व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला आमदार भरणे हे शिवीगाळ करतांना दिसत आहे. भरणे म्हणाले ‘आज जाशील. मी संध्याकाळी ६ नंतर इथंच आहे, मीच तुमच्या मदतीला असतो. बारामतीतलं कुणी येणार नाही’ असे म्हणत भरणे यांनी या तरुणाला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आहे. या शिवीगाळीचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेयर केला आहे.

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

या बाबत रोहिल पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असून धमकी देत आहे. विशेष म्हणजे ज्यांना त्यांनी शिवीगाळ केली आहे, ते त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. त्यांची ही चिडचिड खूप काही सांगून जाणारी आहे. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

शिवीगाळ केल्याचे वृत्त भरणे यांनी फेटाळले

या बाबत आमदार भरणे यांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ केली नसल्याचे म्हटले आहे. मी ग्रामीण भाषेत बोललोय. तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी असून त्याने कार्यकर्त्यांना पैसे वाटले. तो तिथे कुणाशी तरी भांडत होता. या तालुक्यात ६ वाजेनंतर कुणीही नसतं, आपणच एकमेकांना असतो. मी तिथे गेलो तेव्हा लोक अंगावर धावून गेली होती. पण मी त्याला वाचवलं. तो तरुण माझ्याबद्दल चुकीचा बोलला होता. त्यामुळे त्याला ग्रामीण भाषेतून सुनावले असे भरणे यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

या बाबत रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत दत्तात्रय भरणे यांचा मतदारांना दमदाटीचा व्हिडिओ प्रकरणी त्यांना चांगलेच सुनावले आहे. भरणे यांना ही भाषा शोभत नाही. यासंबंधी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

WhatsApp channel