मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nitin Gadkari : यवतमाळमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांना भोवळ, आता कशी आहे प्रकृती?

Nitin Gadkari : यवतमाळमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांना भोवळ, आता कशी आहे प्रकृती?

Apr 24, 2024, 06:57 PM IST

  • Nitin Gadkari News : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद इथं महायुतीच्या प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर आल्याची घटना घडली आहे.

यवतमाळमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांना भोवळ, आता कशी आहे प्रकृती?

Nitin Gadkari News : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद इथं महायुतीच्या प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर आल्याची घटना घडली आहे.

  • Nitin Gadkari News : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद इथं महायुतीच्या प्रचार सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चक्कर आल्याची घटना घडली आहे.

Nitin Gadkari in Pusad : लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दुपारी यवतमाळमध्ये भोवळ आल्याचं समोर आलं आहे. स्टेजवर भाषण करतानाच हा प्रकार घडला. त्यांच्यावर तातडीनं प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Amol Kolhe : मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी घेतला ब्रेक

Sharad Pawar : बालबुद्धी राजकारणी... अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांचा जोरदार पलटवार

Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Raj Thackeray : मुंबईत मोदी-राज ठाकरेंची ऐतिहासिक सभा; शिवतीर्थावरील रॅलीचा पहिला टिझर आला समोर, Video

मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक समजले जाणारे नितीन गडकरी हे स्वत: नागपूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या मतदारसंघात मतदान झालं. त्यानंतर आता ते देशभरात एनडीए व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

गडकरी हे आज दुपारी यवतमाळमधील पुसद इथं प्रचारसभेला गेले होते. महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गडकरी यवतमाळमध्ये होते. व्यासपीठावर भाषण देत असतानाच त्यांना भोवळ आली. हे लक्षात येताच बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांनी व नेत्यांनी त्यांना सावरलं.

गडकरी यांना भोवळ आल्यानं व्यासपीठावर उपस्थित लोकांची तारांबळ उडाली. लगेचच त्यांना पाणी देण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बरं वाटलं. काही वेळानंतर त्यांनी व्यासपीठावर येऊन भाषणही केल्याचं समजतं. अति उष्णतेमुळं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

नितीन गडकरी यांनी केलं ट्वीट

या घटनेनंतर नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीट केलं आहे. ‘पुसद येथील सभेत उष्णतेमुळं अस्वस्थ वाटलं. मात्र आता मी पूर्णपणे फिट असून पुढील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वरुडला रवाना होत आहे. आपली आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद,’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.

याआधीही आली होती नितीन गडकरी यांना भोवळ

नितीन गडकरी यांना भर कार्यक्रमात भोवळ येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१८ साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना गडकरी यांना भोवळ आली होती. त्यानंतर २०१९ साली शिर्डीतील एका कार्यक्रमात ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर, २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात त्यांना भोवळ आली होती. भाषण सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची तब्येत बरी झाली होती.

पुढील बातम्या