मराठी बातम्या  /  निवडणुका  /  LokSabha Election: '..त्यामुळे मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांचं जाहीर सभेत विधान

LokSabha Election: '..त्यामुळे मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांचं जाहीर सभेत विधान

Apr 03, 2024, 04:10 PM IST

  • Wardha Loksabha Constituency : जी गोष्ट आम्हाला इतक्या वर्षात जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली आहे. पवारांनी वर्धा पंजामुक्त केलं आहे. त्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

फडणवीस म्हणाले मला शरद पवारांचे आभार मानायचे आहेत.

Wardha Loksabha Constituency : जी गोष्ट आम्हाला इतक्या वर्षात जमली नाही,ती शरद पवारांनी करुन दाखवली आहे. पवारांनी वर्धा पंजामुक्त केलं आहे. त्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

  • Wardha Loksabha Constituency : जी गोष्ट आम्हाला इतक्या वर्षात जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली आहे. पवारांनी वर्धा पंजामुक्त केलं आहे. त्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

LokSabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार सभांमधून विरोधकांवर शरसंधान साधले जात आहे. मात्र वर्ध्यातील सभेतभाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क शरद पवारांचे आभार मानल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं आहे, त्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

फडणवीस म्हणाले मला शरद पवारांचे मनापासून आभार मानायचे आहेत. जी गोष्ट आम्हाला इतक्या वर्षात जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली आहे. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. जिल्हा परिषद, विधानसभा, नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो. मात्र काँग्रेसला जिल्ह्यातून ह्दपार करता आले नाही. हे काम शरद पवारांनी केल्याने त्यांचे मनापासून आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला. शरद पवारांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. महात्मा गांधींच्या नावावर काँग्रेसने इतकं वर्ष राजकारण केलं, त्याच गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. यासाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत, असा खोचक टोका देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

वर्धा मतदारसंघातून भाजपाने रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. फडणवीस म्हणाले की, सध्या मोदींची लाट नसून सुनामी आहे. येथे रामदास तडस ६० टक्के मतं मिळवून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वर्ध्यात काँग्रेसला उमेदवार मिळना झालाय. गांधीजींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवारांचं असून ते मोदी व भाजपाचं आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्याचं फडणवीस म्हणाले.

रामदास तडस पैलवान आहेत तसेच ती कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कुस्तीगीर परिषदेवर इतकं वर्ष शरद पवारांचं पॅनेल होतं. पण या पैलवानाने असा डाव टाकला की कुस्तीगीर परिषद त्यांच्या हातात आली. रामदार तडस यांनी सातत्याने सर्वसामान्यांसाठी भूमिका घेतली असून ते लोकांसाठी कधीही उपलब्ध असतात. २०१९ च्यानिवडणुकीत रामदास तडस यांनी ५२ टक्के मतं मिळवली होती. त्यावेळी मोदी लाट होती. आता तर मोदींची सुनामी आहे. त्यामुळे यावेळी ६० टक्के मतं घ्यावी लागतील. त्यांना लोकांचे मोठं समर्थन मिळत आहे.

 

मोदींनी देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणली आहे. तिसऱ्या टर्ममध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे. मोदीच्या कार्यकाळाआधी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानी होती. मोदीने गेल्या १० वर्षात विकासाचे काम केले आहे. २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून वर काढले आहे.

पुढील बातम्या