सागर बंगल्यावर होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मुलगी दिविजासोबत होळी खेळली.
महायुतीच्या जागावाटपातून वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत होळी खेळली. धुळवडीचे खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना देवेंद्र फडणवीसांनी याला कॅप्शन दिलं की, रंगांची उधळण करत अमृता, दिवीजा आणि परिवारासह होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.