मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election Phase 2: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ६२.७१ टक्के मतदान

Lok Sabha Election Phase 2: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ६२.७१ टक्के मतदान

Apr 28, 2024, 09:43 AM IST

  • Maharashtra records lowest voter turnout:  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १२ राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात किती टक्के लोकांनी मतदान केले, हे जाणून घेऊयात. (HT)

Maharashtra records lowest voter turnout: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १२ राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले आहे.

  • Maharashtra records lowest voter turnout:  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १२ राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान झाले. राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.७१ टक्के मतदान झाले असून, हे सर्व १२ राज्यांमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला? हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं मतदान; मतदानानंतर काय म्हणाले? वाचा

Lok Sabha Election 2024: उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता

EVM मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना पडणार महागात! निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हा

Loksabha Election : ठाण्यातील नौपाडा येथे ईव्हीएम बंद! पावणे आठपर्यंत मतदान ठप्प; अनेक मतदार मतदान न करताच परतले माघारी

आठ जागांसाठी एकूण २०४ उमेदवार रिंगणात

अमरावती, नांदेड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ वाशिम, अकोला, वर्धा आणि हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघांसाठी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. बुलडाणा (२१), अकोला (३७), वर्धा (२४), यवतमाळ वाशीम (१७), हिंगोली (३३), नांदेड (२३) आणि परभणी (३४) या आठ जागांसाठी एकूण २०४ उमेदवार रिंगणात आहेत.

Nanded Man Damages EVM: नांदेडमध्ये मतदारानं कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीन फोडलं, रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावरील प्रकार

दुसऱ्या टप्प्यात किती मतदान?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ध्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदान झाले आहे.परभणीत ५३.७९ टक्के मतदान झाले असून, मतदारसंघातील एका गावातील नागरिकांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून मतदानावर बहिष्कार टाकला होता. नांदेडमध्ये ५२.४७ टक्के, अकोल्यात ५२.४९ टक्के, यवतमाळ वाशिममध्ये ५४.०४ टक्के, अमरावतीत ५४.५०.७६ टक्के, हिंगोलीत ५२.०३ टक्के आणि बुलडाण्यात ५१.२४ टक्के मतदान झाले आहे.

Loksabha Election 2024 : राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड! निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार ताटकळले

या उमेदवारांमध्ये लढत

आठ मतदारसंघांपैकी बुलढाणा, यवतमाळ-वाशीम आणि हिंगोली या आठ मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यात लढत आहे. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अमरावतीत आता भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात किती मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या जागांवर एकूण ६३.७० टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

पुढील बातम्या