मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah Amravati Rally : आधीच मैदानासाठी राडा, त्यात वादळी वाऱ्याने अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळला

Amit Shah Amravati Rally : आधीच मैदानासाठी राडा, त्यात वादळी वाऱ्याने अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळला

Apr 23, 2024, 07:08 PM IST

  • Amit Shah Rally Amravati : अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर नवनीत राणा (Navneet Rana)  यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, पण वादळी वाऱ्यामुळे मैदानात उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे.

वादळी वाऱ्याने अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळला

Amit Shah Rally Amravati : अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, पण वादळी वाऱ्यामुळे मैदानात उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे.

  • Amit Shah Rally Amravati : अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर नवनीत राणा (Navneet Rana)  यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे, पण वादळी वाऱ्यामुळे मैदानात उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे.

Mandap collapse before amit shah rally : अमरावती मतदारसंघात ((Amravati Lok Sabha Election) बच्चू कडू व नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद उफाळला आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर सभा होणार आहे. मात्र है मैदान आम्ही आधी बुक केलं होतं, त्याचे पैसेही भरले आहेत, मग येथे अमित शहांची सभा कशी? असा सवाल करत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (bacchukadu) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मैदानावरच राडा केला आहे. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे या मैदानावर अमित शहांच्या सभेसाठी घालण्यात आलेला मंडप कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

अमित शहा यांच्या सभास्थळावरील मंडपाचा (Amit Shah Rally) काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. या सभास्थळाच्या परवानगीवरून एकीकडे बच्चू कडू आक्रमक झाले असताना आता शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने चर्चा रंगली आहे.

अमित शहांच्या सभेची तयारी पूर्ण -

नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमरावतीत अमित शाह यांची सभा होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र मुख्य मंडपाच्या बाजूचा मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. मंगळवारी दुपारपासून बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानावर ठाण मांडून आहेत. मैदानावरून राजकीय वाद उफाळल्याने मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मैदानावर सभेसाठी बच्चू कडू यांना परवानगी दिली असताना ऐन वेळी बच्चू कडू यांना मैदानावर जाण्यापासून रोखण्यात आले.

३५ हजार लोक बसू इतका मोठा मंडप -

अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात अमित शहांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे मैदानातला मंडप कोसळला आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी ३५ हजार लोक बसू शकतील, एवढा हा मंडप आहे.

 

त्यांची हनुमान चालिसा चुकीची होती – बच्चू कडू

बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना म्हटले की, त्यांची हनुमान चालिसा चुकीची होती. ती राजकीय होती. हनुमानजींनी काम दाखवलं आहे, एक लाथ मारली आणि सभेचा मंडप पाडला. तुमच्या जबरदस्तीवर हनुमानजीही बोलत आहेत. देवही आमच्यासोबत आहे. येथे कायदा राहिलेला नाही. पोलीस अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल, असं पोलीस सांगत असल्याचा दावा बच्च कडू यांनी केला आहे.

पुढील बातम्या