Amravati News: अमरावतीत मैदानावरून हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडूंनी बुक केलेलं मैदान नवनीत राणांनी मारलं
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amravati News: अमरावतीत मैदानावरून हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडूंनी बुक केलेलं मैदान नवनीत राणांनी मारलं

Amravati News: अमरावतीत मैदानावरून हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडूंनी बुक केलेलं मैदान नवनीत राणांनी मारलं

Apr 23, 2024 05:54 PM IST

Amravati Lok Sabha : सायन्स कोर मैदानावर सभा घेण्यास आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा(Amit Shah Sabha) यांची सभा कशी?',असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

अमरावतीत मैदानावरून बच्चू कडू आक्रमक
अमरावतीत मैदानावरून बच्चू कडू आक्रमक

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.

अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बुधवारी होणाऱ्या नवनीत राणांच्या प्रचार सभेसाठी अमरावती पोलिसांनी मैदान ताब्यात घेतल्यानंतर बच्चू कडू शेकडो कार्यकर्त्यांसह ग्राउंडवर दाखल झाले. त्यानंतर बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाला. बच्चू कडू यांनी पोलिसांना विनंती केली की, आमच्याकडे रीतसर परवानगी आहे, त्यामुळे आम्हाला मैदानाचा ताबा द्या, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होत आहेत. महायुतीकडून नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे मैदानात आहेत. याशिवाय बच्चू कडूंच्या प्रहार पक्षानेही दिनेश बुब यांना मैदानात उतरवले आहे. त्याचबरोबर आनंदराज आंबेडकरही अमरावतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या २४ एप्रिलला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा यांची सभा होणार आहे.

Whats_app_banner