मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: अंबानी, अदानीबाबत राहुल गांधी आता गप्प का? किती थैल्या घेतल्या? नरेंद्र मोदींचा सवाल

Lok Sabha Election 2024: अंबानी, अदानीबाबत राहुल गांधी आता गप्प का? किती थैल्या घेतल्या? नरेंद्र मोदींचा सवाल

May 08, 2024, 06:37 PM IST

    • PM Narendra Modi Slams Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

PM Narendra Modi Slams Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

    • PM Narendra Modi Slams Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील करीमनगर येथील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

Telangana Lok Sabha Elections 2024: संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आपल्या भाषणात उद्योगपती अंबानी आणि अदानी यांचे नाव घेणारे राहुल गांधी आता गप्प का, किती थैल्या घेतल्या? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024: उत्तनमधील ५००० मच्छीमार मतदानाला मुकण्याची शक्यता

EVM मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना पडणार महागात! निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हा

Loksabha Election : ठाण्यातील नौपाडा येथे ईव्हीएम बंद! पावणे आठपर्यंत मतदान ठप्प; अनेक मतदार मतदान न करताच परतले माघारी

Lok sabha Election 5 phase voting live : राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील करीमनगर येथील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, गेली ५ वर्षे काँग्रेसचे राजपुत्र दिवसरात्र उद्योगपती अंबानी, अदानी यांचे नाव घ्यायचे. पण लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी, अदानी यांच्याविरोधात बोलणे बंद केले. मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांनी अदानी, अंबानी यांच्याकडून किती माल गोळा केला? काळ्या पैशाच्या गोण्या भरल्या आहेत का? टेम्पो भरून पैसे काँग्रेसपर्यंत पोहोचले आहेत का? काहीतरी गडबड आहे. काँग्रेस पक्षाला उद्योगपतींकडून निवडणुकीसाठी किती पैसे मिळाले? असा सवाल मोदींनी विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्या ठिकाणी आणि कधी अंबानी आणि अदानी यांचे नाव घेतले आहे, याची माहिती दिली आहे.

मोदींच्या टीकेला मल्लिकार्जुन खरगे यांचे प्रत्युत्तर

मोदींच्या टीकेला काँग्रेस नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिले. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, 'काळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिला नाही, लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्लाबोल करत आहेत. मोदीजींची खुर्ची डळमळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, हे त्याची लक्षणे आहेत.

प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, 'मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी देशाची संपत्ती कोणाला वाटली? पंतप्रधानांना स्पष्टीकरण का द्यावे लागते? कारण लोकांना समजत आहे की, त्यांना मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. पण देशातील उद्योगपतींना सर्व काही मिळत आहे. त्यांचे कर्ज माफ केले जात आहे. व्यासपीठावरून या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही मिळतील.

पुढील बातम्या