मराठी बातम्या  /  निवडणुका  /  naresh mhaske : चर्चेच्या टेबलावर शिंदे गटाची भाजपवर मात; कल्याणसह ठाण्याची जागाही घेतली! नरेश म्हस्के यांना उमेदवारी

naresh mhaske : चर्चेच्या टेबलावर शिंदे गटाची भाजपवर मात; कल्याणसह ठाण्याची जागाही घेतली! नरेश म्हस्के यांना उमेदवारी

May 01, 2024, 10:49 AM IST

  • Thane kalyan lok Sabha constituency : महायुतीनं कल्याणमधून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना तर, ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

चर्चेच्या टेबलावर शिंदे गटाची भाजपवर सरशी; ठाण्याची जागा घेतली! नरेश म्हस्के यांना उमेदवारी

Thane kalyan lok Sabha constituency : महायुतीनं कल्याणमधून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना तर, ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • Thane kalyan lok Sabha constituency : महायुतीनं कल्याणमधून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना तर, ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Thane kalyan lok Sabha constituency : महायुतीच्या जागावाटपात वादाचा विषय ठरलेले ठाणे व कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्वत:कडं ठेवण्यात यश मिळवलं आहे. या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. कल्याणमधून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना तर, ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये महायुतीचं टेन्शन वाढणार! मराठा समाजाकडून महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांना पाठिंबा जाहीर

Narendra Modi : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी, सभेत गोंधळ

Mumbai Lok sabha : महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; काँग्रेसच्या गोंधळानंतर ठाकरेंचा उमेदवार प्रचार न करताच परतला

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन जवळपास महिना उलटत आला तरी महायुतीच्या जागावाटपचा तिढा कायम होता. ठाणे, व कल्याण यापैकी एक मतदारसंघ स्वत:कडं ठेवण्यासाठी भाजप आग्रही होता. त्यामुळं उमेदवारी जाहीर होऊ शकली नव्हती. अखेर या दोन्ही जागा शिंदे गटाकडं आल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेनं इथं उमेदवारही जाहीर केले आहेत.

दोन शिवसैनिक भिडणार!

ठाण्यातून नरेश म्हस्के यांना विद्यमान खासदार व ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेले राजन विचारे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. म्हस्के आणि विचारे हे दोन्ही कट्टर शिवसैनिक आहेत. म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा म्हस्के हे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मीडियासमोर शिंदे सेनेची बाजूही ते मांडत होते. त्याचं फळ त्यांना उमेदवारीच्या रूपानं मिळालं आहे. ठाणे लोकसभेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळं इथली लढत चुरशीची ठरणार आहे.

श्रीकांत शिंदे यांना वैशाली दरेकर यांचं आव्हान

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत. या जागेसाठी भाजपनं सुरुवातीपासूनच फिल्डिंग लावली होती. भाजपचे केंद्रीय निरीक्षक अनेकदा या मतदारसंघात येऊन गेले होते. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यापुढं मुलाची जागा राखण्याचा पेच निर्माण झाला होता. तो त्यांनी सोडवला आहे. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

गणपत गायकवाड फॅक्टर कळीचा ठरणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर मैदानात आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. शिंदे गटाशी राजकीय वैर असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी खुलेपणानं वैशाली दरेकर यांना पाठिंबा दिला आहे. गणपत गायकवाड यांच्या पत्नी उघडपणे महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. त्यामुळं या जागेकडंही राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

पुढील बातम्या