मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amravati news : नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तसं बोललेच नाही; त्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा घाईघाईनं खुलासा

Amravati news : नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तसं बोललेच नाही; त्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा घाईघाईनं खुलासा

Apr 16, 2024, 07:27 PM IST

  • Navneet Rana on Modi wave : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तसं बोललेच नाही; त्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा घाईघाईनं खुलासा

Navneet Rana on Modi wave : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला आहे.

  • Navneet Rana on Modi wave : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला आहे.

Navneet Rana : अमरावती इथल्या एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेबाबत केलेल्या वक्तव्याची उलटसुलट चर्चा होताच नवनीत राणा यांनी लगेचच खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मोदींबद्दल मी असं बोललेच नव्हते, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha Constituency) भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. राणा यांच्यासमोर महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचं आव्हान आहे. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानंही दिनेश बूब यांना उमेदवारी देऊन राणा यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळं तिथल्या प्रचारात रंगत आली आहे.

नवनीत राणा मोठ्या जोमानं प्रचार करत आहेत. एका प्रचारसभेत कार्यकर्त्याना सजग राहण्याचं आवाहन करताना राणा यांनी ‘फुग्यात राहू नका. नरेंद्र मोदींची हवा आहे त्यावरून निवडून येऊ अशा भ्रमात राहू नका,’ असं विधान केलं होतं. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.

नवनीत राणा यांनीच भाजपला घरचा आहेर दिला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. तर, भाजपच्या फुग्यातील हवा राणा यांनी काढली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हाणला होता. त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खुलासा केला आहे.

मोदींची हवा आहे आणि राहील!

काही गोष्टी एडिट करून मीडियाच्या बातम्या विरोधक विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपचे देशभरातील उमेदवार पंतप्रधान मोदी यांच्याच नावानं प्रचार करत आहेत. मोदींच्या कामावरच मतं मागत आहेत. संपूर्ण देशात मोदींना स्पर्धकच नाही. मोदींची हवा देशात होती, आहे आणि राहील. देशाच्या विकासासाठी मोदी आवश्यक आहे. अब की बार, ४०० पार नक्की आहे. २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांनी गलिच्छ राजकारण करू नये!

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दलही विरोधकांनी असाच प्रकार केला आहे. मी जे बोलले नव्हते, ते माझ्या तोंडी घातलं जात आहे. खरंतर मी अचलपूरचे आमदार माझ्या कुटुंबीयांबद्दल बोलले होते, त्यांच्याबद्दल मी काही शब्द वापरले होते. विरोधकांनी हे गलिच्छ राजकारण करू नये. लोकांच्या हिताची चर्चा करावी, असं राणा यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या