मराठी बातम्या  /  निवडणुका  /  '....तो पर्यंत वाघाच्या कातड्या पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत'; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

'....तो पर्यंत वाघाच्या कातड्या पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत'; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Apr 22, 2024, 08:13 AM IST

    • eknath shinde criticize uddhav thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काल झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे नकली वाघ असून ते केवळ पोकळ डरकाळ्या फोडतात असे शिंदे म्हणाले.
वाघाच्या कातड्या पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाही'; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

eknath shinde criticize uddhav thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काल झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे नकली वाघ असून ते केवळ पोकळ डरकाळ्या फोडतात असे शिंदे म्हणाले.

    • eknath shinde criticize uddhav thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काल झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे नकली वाघ असून ते केवळ पोकळ डरकाळ्या फोडतात असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde criticize uddhav thackeray : उद्धव ठाकरे हे नकली आहे. त्यांच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष देखील नाही. मी एरिअल फोटो काढणारा किंवा नुसते फेसबूक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही, मी शेतकाऱ्यांच्या बांधावर जाणारा मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये आले आणि पोकळ गप्पा करून गेलेत. ते खरे वाघ नाहीत. हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्यांचा कधीच वाघ होऊ देणार नाही. या देशात केवळ एकच वाघ होऊन गेला. त्यांचे नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये महायुतीचं टेन्शन वाढणार! मराठा समाजाकडून महाविकास आघाडीच्या २ उमेदवारांना पाठिंबा जाहीर

Narendra Modi : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी, सभेत गोंधळ

Mumbai Lok sabha : महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; काँग्रेसच्या गोंधळानंतर ठाकरेंचा उमेदवार प्रचार न करताच परतला

Narendra Modi investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती इन्कम टॅक्स भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Uday Samant : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या कारवर दगडफेक; प्रचारसभेला जाताना घडली घटना

ठाण्यात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जहरी टीका करत उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्य अहवालाच्या प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra Weather Update: कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता! तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती काय ?

शिंदे म्हणाले, राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत. पूर्व विदर्भात सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत. २०१९मध्येचे बाळासाहेब ठाकरे व जनतेच्या विचाराचे सरकार झाले पाहिजे होते. मात्र, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत हे काँग्रेससोबत गेले. मात्र, ती चूक आम्ही दुरुस्त केली. त्यांच्या अहंकारामुळे राज्य खड्ड्यात गलेले आहे. आज आम्ही एकत्र येत सरकार स्थापन केले. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी जी कामे केली आहे, त्यामुळे देशाची प्रगती होत आहे. त्यामुळे तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात आराम करणारा व्यक्ती हवा, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिंदे म्हणाले, ही निवडणूक देशाच्या विकासाची असून मोदीजी देशाला महासत्तेकडे नेणार आहेत. बाळासाहेबांचे विचार ही आमची संपत्ती व ऐश्वर्य आहे. हनुमान चालिसा म्हटल्याने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना या निवडणुकीत रामभक्त आणि हनुमानभक्त जागा दाखवतील असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढील बातम्या