मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Trending news : इन्फ्लुएन्सर्सपासून सावध राहा; 'झिरोधा'च्या आजारी संस्थापकाला टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला

Trending news : इन्फ्लुएन्सर्सपासून सावध राहा; 'झिरोधा'च्या आजारी संस्थापकाला टाटा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सल्ला

Feb 28, 2024, 03:15 PM IST

  • Tata Doctor advice to Nikhil Kamath : टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सीएस प्रमेश यांनी 'झिरोधा'चे संस्थापक निखिल कामत यांना सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Tata Doctor advice to Nikhil Kamath

Tata Doctor advice to Nikhil Kamath : टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सीएस प्रमेश यांनी 'झिरोधा'चे संस्थापक निखिल कामत यांना सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • Tata Doctor advice to Nikhil Kamath : टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सीएस प्रमेश यांनी 'झिरोधा'चे संस्थापक निखिल कामत यांना सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Zerodha Founder Nikhil Kamath : हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर प्रकृती सुधारत असलेले ‘झिरोधा’चे संस्थापक निखिल कामत यांना मुंबईतील टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएस प्रमेश यांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘आरोग्याच्या बाबतीत सोशल मीडियावरील कुठल्याही एन्फ्लुएन्सरच्या नादी लागू नका. त्यांच्या सल्ल्याकडं लक्ष देऊ नका,’ असं डॉ. प्रमेश यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आणि ट्रेडिंग ॲप ‘झेरोधा’चे नितीन कामथ यांना सोमवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं कामत यांना स्ट्रोकबाबत काही सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सीएस प्रमेश यांनी कामत यांना सावध केलं आहे.

सीएस प्रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका इन्फ्लुएन्सरची पोस्ट टाकली आहे. सोशल मीडियाच्या आयुष्यासाठी किती घातक ठरू शकतो हेच या पोस्टवरून दिसतं. कृपा करून अशा कोणावरही विश्वास ठेवू नका, असं प्रमेश यांनी म्हटलं आहे. ‘आपण जे बोलतो ते कसं सत्य आणि योग्य आहे हे सांगण्यासाठी हे लोक, 'माझ्यावर विश्वास ठेवा, भाऊ,' असे शब्द वापरतात, पण त्यांच्याकडं विज्ञानाबद्दल बोलायला काही नसतं, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे.

डॉ. प्रमेश यांनी आणखी एका सोशल मीडिया पोस्टवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'या पोस्टमध्ये जे काही म्हटलं आहे, त्याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळं विज्ञानाची किंवा वैद्यकीय ज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या कुठल्याही इन्फ्लुनसरच्या जाळ्यात अडकू नका, असं प्रमेश यांनी म्हटलं आहे.

'सर्वसाधारणपणे लोक जेव्हा एखादा सल्ला देतात, तेव्हा त्यांचा हेतू शुद्ध असतो. मात्र, कुठल्याही शास्त्रीय आधाराशिवाय किंवा माहितीशिवाय दिलेला सल्ला धोकादायक असतो. त्यापेक्षा संबंधित विषयातील तज्ज्ञांवरच विश्वास ठेवा. सावध राहा, असं प्रमेश यांनी म्हटलं आहे.

कशी आहे नितीन कामत यांची प्रकृती?

नितीन कामथ यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांनी स्वत: X वर ही माहिती दिली होती. 'मला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. वडिलांचं निधन, अपुरी झोप, थकवा, डिहायड्रेशन आणि जास्त व्यायाम, यापैकी एखादं त्याचं कारण असावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

कामत यांची प्रकृती आता सुधारत आहे. मात्र अजूनही ते पूर्णपणे फिट नाहीत. वाचन आणि लिखाण करतानाही त्यांना त्रास होत आहे. पूर्ण बरे होण्यासाठी त्यांना ३ ते ६ महिने लागतील, अशी माहिती आहे.

पुढील बातम्या