Anant Ambani-Radhika Merchant: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या जोडप्याचा प्री-वेडिंग सोहळा १ ते ३ मार्च या कालावधीत गुजरातमधील जामनगर येथे होणार आहे.
हा प्री वेडिंग सोहळा खास व संस्मरणीय बनवण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली आहे. या प्री-वेडिंग सोहळ्याला देश-विदेशातून अनेक पाहुणे येणार आहेत. पाहुणचाराची कमतरता भासू नये यासाठी खास इंदोरी पदार्थ तयार केले जातील. या प्री- वेडिंग सोहळ्यात पाहुण्यांसाठी २ हजार ५०० पदार्थांची व्यवस्था केली जाणार आहे. एवढेच नव्हेतर, या तीन दिवसांत पु्न्हा होणार नाही, याचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी इंदूरहून जामनगरला २५ शेफची टीम रवाना करण्यात येणार आहे. पारशी, थाई, मेक्सिकन आणि जपानी पदार्थांसह विविध पॅन-आशियाई पदार्थांसह इंदोरी पाककृती हे पाककलेचे आकर्षण असेल, असे जार्डिन हॉटेलच्या संचालकांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात २ हजार ५०० वेगवेगळे पदार्थ मेन्यूमध्ये सादर करण्यात येणार आहेत. ब्रेकफास्टमध्ये ७० पेक्षा जास्त पर्याय असतील. त्यानंतर दुपारचे आणि रात्रीच्या जेवणाचे प्रत्येकी २५० पेक्षा जास्त पर्याय असतील. तसेच शाकाहारी पाहुण्यांच्या जेवणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्रीचा स्नॅक्सही मिळणार आहेत, त्यामुळे गॅस्ट्रोनॉमिक फेस्टिव्हलला अनोखा टच मिळणार आहे.
या सोहळ्याला तब्बल एक हजार पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्री ८५ स्नॅक्स होणार आहे. रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पाहुण्यांसाठी उपलब्ध असतील. कार्यक्रम तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पाहुणे विविध थीमवर आधारित कार्यक्रमांना उपस्थित राहतील, प्रत्येकाचा ड्रेसकोड निमंत्रितांना देण्यात आलेल्या 'इव्हेंट गाईड'मध्ये नमूद करण्यात आला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे येत्या १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे.
प्री- वेडिंग सोहळ्याला उद्योगपती, गायक, अभिनेते आणि खेळाडूंसह मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पाहुण्यांच्या यादीमध्ये गौतम अदानी आणि सुनील भारती मित्तल यांसारखे भारतातील प्रमुख अब्जाधीश, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सारखे बॉलिवूडचे महानायक आणि सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीसह क्रिकेट दिग्गजांचा समावेश आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, दिलजीत दोसांझसोबत हॉलिवूडपॉप आयकॉन रिहाना आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणार आहे.