Fastag KYC Update news : तुमची स्वत:ची गाडी असेल आणि तुम्ही फास्टॅग केवायसी करून घेतलं नसेल तर तुमच्याकडं दोनच दिवस आहेत. तसं न केल्यास २९ फेब्रुवारीनंतर एक्स्प्रेवे आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळं २९ फेब्रुवारीपर्यंत तुमचं KYC अपडेट करा. अन्यथा तुमचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला जाण्याचीही शक्यता आहे.
अनेकांच्या एका वाहनावर दोन किंवा अधिक फास्टॅग असतात. त्यामुळं कधीकधी टोल शुल्क कापण्यात अडचण येते. काही लोकांची गाडी दुसऱ्याच्या नावे आहे आणि फास्टॅग भलत्याच कुणाच्या तरी नावानं आहे. असं असेल तरी अडचणी निर्माण होऊ शकतात.
NHAI च्या सूत्रांनुसार, फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. २० ते ३१ जानेवारी दरम्यान मोठ्या संख्येनं लोकांनी त्यांचं केवायसी अपडेट केलं आहे. फास्टॅग वॉलेट सुविधा पुरवणाऱ्या बँका आणि कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी केवायसी अपडेट करण्याची तारीख एक महिना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तेव्हापासून केवायसी अपडेट करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
एका वाहनाला एकापेक्षा जास्त फास्टॅग दिले गेल्यानं अडचणी येत असल्याच्या तक्रारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडं आल्या होत्या. टोल नाक्यावरील यंत्रणा अनेकदा ज्या वॉलेटमध्ये बॅलन्स नाही तोच फास्टॅग स्कॅन करते. त्यामुळं फाटक उघडत नाही. त्यानंतर चालक दुसऱ्या फास्टॅगचे वॉलेट उघडतात आणि पुरेशी शिल्लक असल्याचं दाखवतात. अशा पद्धतीनं फास्टॅग रीडरमध्ये दोष असल्याचं कारण देत सुटका करून घेतात. हे निर्दशनास आल्यानं फास्टॅग केवायसी सुरू करण्यात आली आहे.
नियमांनुसार फास्टॅग घेणाऱ्या व्यक्तीचं केवायसी अपडेट केलं जायला हवं. गाडीही त्या व्यक्तीच्या नावावर असावी. सुरुवातीला गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असली तरी फास्टॅग घेणाऱ्या व्यक्तीची केवायसी असणं आवश्यक आहे.
ज्या कंपनीचा फास्टॅग जारी केला आहे, त्या कंपनीचं फास्टॅग वॉलेट ॲप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर फास्टॅगमध्ये समाविष्ट केलेल्या मोबाइल नंबरसह लॉगिन करा आणि नंतर माय प्रोफाइलवर जा. तिथं केवायसीवर क्लिक करा. ते अपडेट केलेलं नसेल तर KYC भरा पर्यायावर क्लिक करा आणि मागितलेली माहिती भरा.
सर्वप्रथम www.fastag. ihmcl.com ला भेट द्या. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीनं तिथं लॉग इन करा. यानंतर डॅशबोर्ड मेनूमधील My Profile या पर्यायावर जा. तिथं केवायसी स्थिती तपासा. केवायसी अपडेट नसल्यास उपविभागात जा. आयडी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि फोटो यासारखी आवश्यक माहिती तिथं अपलोड करा. यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
संबंधित बातम्या