PAN Card Creation : पॅन कार्ड हे सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचे असेल तर ते फक्त १० मिनिटांत घरबसल्या तुम्हाला काढता येऊ शकते. साधारणत: पान कार्ड काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. यानंतर या साठी तुम्हाला पैसेही भरावे लागतात. मात्र, तरीसुद्धा कार्ड घरी येण्यास विलंब लागतो. त्यामुळे आता अर्ज केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पॅन क्रमांकासाठी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही तसेच कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडेही तुम्हाला कार्ड काढण्यासाठी जावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या घरी बसून फक्त १० मिनिटांत स्वतः ई-पॅन तयार करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
ई-पॅन बनवण्यासाठी, आधार क्रमांक गरजेचा आहे. हे पॅन नियमित पॅन प्रमाणे वापरले जाऊ शकते. आधार कार्डच्या मदतीने ई-पॅन बनवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१. सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमधील ब्राउझर उघडा आणि https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वेबसाइटवर जा.
२. यानंतर खाली डावीकडे दिसणाऱ्या ई-पॅन पर्यायावर क्लिक करा किंवा टॅप करा. एक नवीन पेज उघडेल, ज्यावर तुम्हाला नवीन ई-पॅन मिळवा हा पर्याय निवडावा लागेल.
३. आता तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. तुम्हाला कन्फर्म आयटमच्या समोर दिलेला चेक बॉक्स चेक करावा लागेल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.
४. आता आलेल्या पेज वर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकावा लागेल आणि पॅन कार्डसाठी विचारलेली उर्वरित तुमची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल.
५. हा फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला काही वेळाने पॅन क्रमांक मिळेल.
ई-पॅन नंबर नियमित पॅन प्रमाणे वापरले जाऊ शकते. वरील पद्धतीने ई-पॅन जनरेट केल्यानंतर, तुम्ही वेबसाइटवरून 'चेक स्टेटस/डाउनलोड पॅन' वर क्लिक करून त्याची पीडीएफ फाइल डाउनलोड करू शकता.