मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Alpex Solar IPO : सोलर कंपनीचा हा आयपीओ करू शकतो मालमाल, उद्यापासून गुंतवणुकीची संधी

Alpex Solar IPO : सोलर कंपनीचा हा आयपीओ करू शकतो मालमाल, उद्यापासून गुंतवणुकीची संधी

Feb 07, 2024, 11:40 AM IST

  • Alpex Solar IPO : सोलर कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अल्पेक्स सोलर कंपनीचा आयपीओ उद्या बाजारात येत आहे.

Alpex Solar IPO

Alpex Solar IPO : सोलर कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अल्पेक्स सोलर कंपनीचा आयपीओ उद्या बाजारात येत आहे.

  • Alpex Solar IPO : सोलर कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अल्पेक्स सोलर कंपनीचा आयपीओ उद्या बाजारात येत आहे.

Alpex Solar IPO : केंद्र सरकारनं नुतनीकृत ऊर्जा निर्मितीवर भर दिला असून त्यातही सौर ऊर्जेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आहे. देशातील १ कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळं सोलर कंपन्यांना चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारही सोलर कंपन्यांकडं आकर्षित झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

तुम्ही देखील एखाद्या सोलर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सौर यंत्रणा निर्मिती करणाऱ्या अल्पेक्स सोलर या कंपनीचा आयपीओ उद्या, गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी बाजारात येत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

या आयपीओसाठी प्रति शेअर १०९ ते ११५ असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. Alpex Solar IPO हा SME IPO आहे. हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी आजपासूनच खुला होत आहे.

तपशील काय आहेत?

आयपीओच्या माध्यमातून ७४.५२ कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यासाठी १० रुपये दर्शनी मूल्याचे ६४.८० लाख इक्विटी शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. अल्पेक्स सोलर आयपीओची लॉट साइज १,२०० इक्विटी शेअर्स आहे आणि किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १,३८,००० रुपये मोजावे लागणार आहेत. अल्पेक्सच्या आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी १८.४५ लाख इक्विटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. 

सुमारे ३.२४ लाख इक्विटी शेअर्स मार्केट मेकर्ससाठी, ९.२४ लाख इक्विटी शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs), १२.३१ लाख शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आणि रिटेल (RII) भागामध्ये २१.५५ लाख इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. अल्पेक्स सोलर आयपीओचं वितरण १३ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे आणि १५ फेब्रुवारी रोजी शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होतील. 

जीएमपी प्राइस किती?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अल्पेक्स सोलर आयपीओ ग्रे मार्केटमध्ये १९५ रुपयांच्या प्रीमियममध्ये उपलब्ध आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास कंपनीचे शेअर्स ३१० रुपयांवर लिस्ट केले जाऊ शकतात. याचा अर्थ गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी सुमारे १७० टक्क्यांपर्यंत नफा मिळवू शकतात.

कंपनीची योजना काय आहे?

आयपीओतून उभारल्या जाणाऱ्या एकूण रकमेपैकी १९.५५ कोटी रुपयांचा वापर कंपनीच्या सोलर मॉड्यूल उत्पादन सुविधा अधिक अद्ययावत करण्यासाठी आणि त्याची क्षमता ४५० मेगावॅटवरून १.२ गिगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय, १२.९४ कोटी रुपये कंपनीच्या सौर मॉड्युल्सच्या ॲल्युमिनियम फ्रेमसाठी नवीन उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित २०.४९ कोटी रुपये खेळत्या भांडवलाची गरज आणि उर्वरित कॉर्पोरेट खर्च भागवण्यासाठी वापरले जातील.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या