मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Airtel: एअरटेलचा धमाका; अवघ्या १० रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा आणि १०० SMS फ्री

Airtel: एअरटेलचा धमाका; अवघ्या १० रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा आणि १०० SMS फ्री

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 07, 2024 11:13 AM IST

Airtel Prepaid Plan: भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवीन प्रीपेड प्लान आणला आहे.

Airtel
Airtel (REUTERS)

Airtel Vs Reliance Jio: भारतातील दूरसंचार कंपनी एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्या प्रीपेड प्लान अपडेट करताना दिसत आहेत. नुकताच एअरटेलने एक धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे, ज्यात ग्राहकांना अवघ्या १० रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री मिळत आहेत. एअरटेलच्या या प्लानबाबत जाणून घेऊयात.

VI: अनलिमिटेड कॉलिंगसह भरमसाठ डेटा, ७० दिवसांपर्यत २०० हून अधिक चॅनल फ्री; व्हीआयचा भन्नाट प्लान

एअरटेलचा ५४९ रुपयांचा रिचार्ज

एअरटेलने नुकताच ५४९ रुपयांचा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळत आहे. महत्त्वाचे गोष्ट म्हणजे, या प्लानची वैधता ५६ दिवसांची असेल. याचबरोबर ग्राहकांना या प्लानमध्ये अपोलो २४/७ आणि फ्री हॅलोट्यून आणि Wynk म्यूजिकचे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.

जिओचा २ जीबी डेटा प्लान

रिलायन्स जिओचा ५३३ रुपयांचा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच हा प्लान अनलिमिटेड वॉयस कॉलिंगसह येतो, ज्यामुळे ग्राहकांना आपल्या जवळच्या व्यक्तीशी मनभरून बोलू शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्लानमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.

WhatsApp channel

विभाग