मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infinix Smart 8: आयफोन १४ सारखा लूक आणि फीचर्स, किंमत ८ हजारांपेक्षा कमी; इन्फिनिक्सचा नवा फोन लॉन्च

Infinix Smart 8: आयफोन १४ सारखा लूक आणि फीचर्स, किंमत ८ हजारांपेक्षा कमी; इन्फिनिक्सचा नवा फोन लॉन्च

Feb 06, 2024 05:31 PM IST

Infinix Smart 8 launched in New Variant: इन्फिनिक्स स्मार्ट ८ हा स्मार्टफोन नव्या व्हेरिएंटसह बाजारात दाखल झाला आहे.

Infinix Smart 8
Infinix Smart 8

Smartphones Under 10000: इन्फिनिक्स कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इन्फिनिक्स स्मार्ट ८ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. आता कंपनीने हा स्मार्टफोन नव्या व्हेरिएंटसह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक चिपसेटद्वारे समर्थित आहे. या फोन दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह बाजारात दाखल झाला आहे, ज्याचा लूक आयफोन १४ सारखा आहे. हा फोन Android 13 वर आधारित होते.

ट्रेंडिंग न्यूज

इन्फिनिक्स स्मार्ट ८ हा फोन गॅलेक्सी व्हाइट, रेन्बो ब्लू, शायनी गोल्ड आणि टिंबर ब्लॅक या चार रंगात उपलब्ध आहे. इन्फिनिक्स स्मार्ट ८ (४ जीबी रॅम आणि ६४ स्टोरेज) ७ हजार ४९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. आता हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह पुन्हा लॉन्च करण्यात आला, ज्याची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर देखील मिळत आहे. आयसीआयसीआय बँक डेबिड आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळत आहे. इन्फिनिक्स स्मार्ट ८ (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून इ- कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Redmi: २०० मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनवर तगडं डिस्काउंट, अवघ्या १९ मिनिटांत होतो चार्ज

इन्फिनिक्स स्मार्ट ८ फीचर्स

इन्फिनिक्स स्मार्ट ८ मध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी रिअर सेन्सर आणि क्वाड एलइडी रिंग प्लॅशसह एआय समर्थित सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये ग्राहकांना ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे, जी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel
विभाग