मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPF Transfer news : कोट्यवधी कर्मचाऱ्यांना खूषखबर! आता नोकरी सोडल्यानंतर PF ची रक्कम नव्या कंपनीत आपोआप ट्रान्सफर होणार

EPF Transfer news : कोट्यवधी कर्मचाऱ्यांना खूषखबर! आता नोकरी सोडल्यानंतर PF ची रक्कम नव्या कंपनीत आपोआप ट्रान्सफर होणार

Apr 08, 2024, 10:45 AM IST

  • EPFO New Rules : कोट्यवधी सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं खूषखबर दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, यापुढं नोकरी बदलल्यास पीएफ (PF) ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही सोपस्कार करावे लागणार नाहीत.

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना खूषखबर! नोकरी सोडल्यानंतर PF ची रक्कम नव्या कंपनीत आपोआप ट्रान्सफर होणार

EPFO New Rules : कोट्यवधी सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं खूषखबर दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, यापुढं नोकरी बदलल्यास पीएफ (PF) ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही सोपस्कार करावे लागणार नाहीत.

  • EPFO New Rules : कोट्यवधी सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं खूषखबर दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, यापुढं नोकरी बदलल्यास पीएफ (PF) ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही सोपस्कार करावे लागणार नाहीत.

New EPFO Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ईपीएफओनं आपल्या सदस्यांसाठी एका नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. त्यानुसार यापुढं ईपीएफओ सदस्यानं नोकरी बदलल्यास त्याची पीएफ (PF) रक्कम आपोआप नवीन कंपनी किंवा नव्या मालकाकडं हस्तांतरित केली जाणार आहे. त्यासाठी सदस्याला अर्ज करण्याची गरज नाही. नव्या नियमाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

एखाद्या कंपनीतील नोकरी बदलल्यास पीएफच्या बाबतीत नोकरदाराकडं दोन पर्याय असतात. त्यापैकी एक म्हणजे संपूर्ण रक्कम काढून घेणं आणि दुसरी म्हणजे नव्या कंपनीत ट्रान्सफर करणं. पीएफची रक्कम ट्रान्सफर करायची असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना फॉर्म - ३१ भरावा लागत होता. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असूनही हे सोपस्कार पार पाडावे लागत. मात्र नव्या नियमामुळं हे सोपस्कार करण्याची किंवा फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही.

गडबड, गोंधळ टळेल!

जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो, तेव्हा नवीन कंपनी किंवा नियोक्ता त्याच्या UAN (PF खात्यात) जोडला जातो. त्याला ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन जुने पीएफ खाते नवीन खात्याशी ऑनलाइन लिंक करावे लागते. ईपीएफओ सदस्यांना या प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा काही ना काही त्रुटी राहून जात. याशिवाय जुन्या आणि नव्या कंपनीलाही ही औपचारिकता पूर्ण करावी लागत असेल. आता या प्रक्रियेत कर्मचाऱ्याला काहीही करावं लागणार नाही.

UAN आवश्यक

युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) पीएफ खातेधारकांसाठी सेंट्रलाइज्ड प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो. या नंबरमुळं कर्मचाऱ्याला एकाच वेळी अनेक पीएफ खाती लिंक करता येतात. याशिवाय UAN इतर सेवाही पुरवते. या क्रमांकाच्या मदतीनं ईपीएफओ ​​सदस्य त्यांचं UAN कार्ड आणि PF पासबुक डाउनलोड करू शकतात. एकूण शिल्लक रकमेची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते.

पगाराच्या १२ टक्के योगदान

ईपीएफओच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करावी लागते. कंपन्यांना देखील समान प्रमाणात योगदान द्यावे लागते. या खात्याद्वारे कर्मचाऱ्याला नंतर पेन्शन दिली जाते.

विभाग

पुढील बातम्या