Vivo V30 Lite 4G Launched: विवो कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन विवो व्ही ३० लाइट 4G रशिया आणि कंबोडियासारख्या विविध जागतिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केला आहे. यापूर्वी विवोने व्ही ३० 5G, विवो व्ही ३० प्रो 5G आणि विवो व्ही ३० लाइट 5G च्या श्रेणीत विवो व्ही ३० 4G सामील झाली आहे. विशेष म्हणजे, विवो व्ही ३० लाइट 4G विविध देशात वेगवेगळ्या फीचर्ससह लॉन्च झाला आहे. मेक्सिकोमध्ये विकल्या गेलेल्या आवृत्तीमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ चिप आहे, तर सौदी अरेबियामध्ये स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिप आहे.
विवो व्ही ३० लाइट 4G स्मार्टफोनचे वजन सुमारे १८८ ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये एफएचडी+ रिझोल्यूशनसह ६.६७ इंचाचा ई ४ एमोलेड डिस्प्ले मिळत आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसाठी सक्षम आहे. विवो व्ही ३० लाइट 4G मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्लस डेप्थ सेन्सर मिळत आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतो. हा स्मार्टफोन ८ जीबी एलपीडीडीआर 4X रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, यात ५ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली, जी ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अवघ्या अर्ध्या तासात ८० टक्के चार्ज होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये इनस्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी-सी पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि फ्लिकर सेन्सरचा समावेश आहे.
विवो व्ही ३० लाइट 4G हा स्मार्टफोन कंबोडियामध्ये क्रिस्टल ब्लॅक आणि क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगात उपलब्ध आहे. विवो व्ही ३० लाइट 4G (८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची किंमत २९९ डॉलर आहे. रशियामध्ये याची किंमत २४ हजार ९९९ आरयूबी (अंदाजे २७० डॉलर) आहे.