Stock Grow Break Up Leave : नोकरी करत असतांना कामगारांना वर्षाला काही सुट्ट्या दिल्या असतात. आजारपण, वैयक्तिक कारणांसाठी या सुट्ट्या घेतल्या जातात. या साठी कंपनीला अर्ज देखील करावा लागतो. या सुट्ट्यांचे देखील प्रकार आहेत. पेड लीव्ह, क्याज्युअल लीव्ह, ट्रॅव्हल लीव्ह, अर्न लीव्ह, प्रीव्हीलेज लीव्ह, मॅटर्निटी लिव्ह, पॅटर्निटी लिव्ह या सुट्ट्या प्रमुक्याने काम करणाऱ्यांना दिल्या जातात. असे असले तरी काही कारने अशी असतात की ते उघड न केलेली बरी असतात.
जर एखाद्याचे ब्रेक अप झाले असेल तर त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी एकांताची तसेच मानसिक शांततेची गरज असते. कर्मचाऱ्यांची ही गरज ओळखून एका फिनटेक कंपनीने कर्मचाऱ्यांना थेट ब्रेकअप लिव्ह (Break Up Leave) देण्यास सुरुवात केली आहे. ही पगारी सुट्टी असून कंपनीच्या या सुट्टीची सध्या सोशल मिडीयावर मोठी चर्चा होत आहे.
'स्टॉक ग्रो' असे या कंपनीचे नाव असून ही कंपनी फायनॅन्शीयल टेक्नॉलॉजीत काम करते. ही कंपनी ग्राहकांना ट्रेडिंग, गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन आणि सल्ला देते. या कंपनीचे ३ कोटी युजर्स असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, स्टॉक ग्रोने त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी ही ब्रेक अप लीव्ह लागू केली आहे. ब्रेक अप झाल्यावर कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासातून बाहेर येण्यासाठी व आधार देण्याच्या हेतूने कंपनीने कर्मचाऱ्यांना ही लिव्ह देणीयचे ठरवले आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याच प्रेमात बिनसल्यावर आणि त्यातून ब्रेकअप झाल्याने त्यांना यातून बाहेर येण्यासाठी ही सुट्टी मदत करेल. तसेच त्याला या काळात जी मानसिक शांतता हवी असते ती देखील तो व्यक्ति या सुट्टीच्या माध्यमातून अनुभवू शकेल, असे या कंपनीने या सुट्टी बाबत स्पष्टीकरन देतांना म्हटले आहे. या धोरणाबाबत स्टॉक ग्रो कंपनीचे संस्थापक अजय लखोटिया म्हणाले, आम्हाला कर्मचाऱ्यांची काळजी असून त्यांचे दुख: आम्ही समजून घेऊ शकतो. त्यामुळे ही सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या काळात तो त्याचे दुख: विसरून नव्या जोमाने कामाला लागेल असा आम्हाला विश्वास आहे, असे लाखोटिया म्हणाले.
एखाद्या कर्मचाऱ्याचे जर ब्रेक अप झाले असेल तर त्या कर्मचाऱ्याला अशी सुट्टी घेता येणार आहे. या साठी त्याला बॉसला कळवावे लागणार आहे. मात्र, या बाबत कोणताही पुरावा ब्रेक अप झालेल्या व्यक्तीला द्यावा लागणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, जर त्याला ही सुट्टी वाढवून घ्यायची असेल तर तो ही सुट्टी वाढवून देखील घेऊ शकतो. या सुट्ट्यांमुळे त्याला त्याचे दुख: विसरता येणार आहे. व त्याच्या ब्रेक अप काळात त्याला शांती मिळून पुन्हा तो नव्या जोमाने कामावर रुजू होऊ शकणार आहे.
संबंधित बातम्या