मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver rate today : बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; आजचा दर किती?

Gold Silver rate today : बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; आजचा दर किती?

Feb 02, 2024, 04:03 PM IST

  • Gold Silver rate today : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत.

Gold Silver Price Today

Gold Silver rate today : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत.

  • Gold Silver rate today : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत.

Gold Silver rate today : लगीनसराईच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आज, म्हणजेच शुक्रवारी तोळ्यामागे ५५४ रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीच्या दरानं ९४३ रुपयांची उसळी घेतली आहे. 

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स (IBJA)नं प्रसिद्ध केलेल्या नवीन दरानुसार, आज २४ कॅरेट सोने ५५४ रुपयांनी महागले आणि ६३,१५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. सोन्याच्या दराच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा ही किंमत ६५२ रुपयांनी कमी आहे. मागील वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्यानं तोळ्यामागे ६३८०५ रुपयांचा उच्चांकी दर नोंदवला होता. 

चांदीच्या दरात प्रतिकिलो ९४३ रुपयांची बंपर वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदीची किंमत ७१,७७७ रुपये प्रति किलो आहे.

Suzlon Share Price : सरकारी घोषणेचे बाजारात सकारात्मक पडसाद; सुझलॉनच्या शेअरनं रचला इतिहास

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?

आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ५५२ रुपयांनी वाढून ६२९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोने आता ५०७ रुपयांनी महागले असून तोळ्यामागे ५७८४८ रुपयांवर ​​पोहोचलं आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे ४१६ रुपयांनी वाढला असून तो आता ४७३६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी वाढून ३६९४५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. 

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक!

दिल्ली ते पाटण्यापर्यंत वाढले दर 

सोने आणि चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने जारी केले आहेत. आयबीजेएच्या दरांनुसार, मुंबई, दिल्ली, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर आणि पाटणासह सर्व शहरांमध्ये सोन्या-चांदीची सरासरी किंमत वाढली आहे. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचं शुल्क लागू नाही. त्यामुळं तुमच्या शहरात सोने-चांदीची प्रत्यक्ष किंमत १ ते २ हजार रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे.

मुंबईत सोन्याचा आजचा दर

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ६३,६०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५८,३०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्याला ४७,७०० रुपये इतका आहे. तर, चांदीचा भाव मुंबईत किलोमागे ७६,५०० रुपये इतका आहे.

विभाग

पुढील बातम्या