Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक!-bollywood actor ranveer singh invests in audio wearables brand boat ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक!

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक!

Feb 01, 2024 06:45 PM IST

Ranveer Singh invests In Boat: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक केली आहे.

Ranveer Singh
Ranveer Singh

Ranveer Singh Investnment News: अग्रगण्य ऑडिओ वेअरेबल ब्रँड बोटने अभिनेता रणवीर सिंहला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. या कंपनीत रणवीर सिंहने काही पैशांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली. मात्र, किती पैशांची गुंतवणूक केली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. बोटच्या ऑडिओ उत्पादनांचा अधिकृत चेहरा म्हणून रणवीरने स्वाक्षरी केली आहे. रणवीर हा 'लॉस्ट इन निर्वाणा' या त्यांच्या नवीन मोहिमेचा स्टार असेल.

बोट कंपनीचे सह- संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "रणवीर सिंहने बोट कंपनीत केलेली गुंतवणूक क्रांती घडवून आणेल. आम्ही एकमेकांसोबत कंपनीचा विस्तार करू. तसेच बाजारात आमची छाप सोडू." रणवीर सिंह भारतीय क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिग्ज, कियारा अडवाणी, रश्मिका मंदाना, हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या नामांकित व्यक्तींसह बोटसाठी ब्रँड ॲम्बेसेडरच्या गटात सामील झाला.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बोटने ३ हजार ३७७ कोटी रुपयांची कमाई नोंदवली. या अर्थिक वर्षात बोट कंपनीला पहिल्यांदा तोटा सहन करावा लागला. कंपनीला २०२३ मध्ये १२९. ४ कोटी रुपयांचा तोटा झाला. बोट कंपनी नॉईज, फायर-बोल्ट आणि एमआय सारख्या स्टार्टअप्सशी स्पर्धा करते.इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत २६.६ टक्के मार्केट शेअरसह बोट हा टॉप वेअरेबल ब्रँड होता.

रणवीर सिंह अनेक सिनेमांत आणि जाहीरातींत काम करत असतो. रिपोर्टनुसार, रणवीर प्रत्येक सिनेमासाठी १० ते १२ कोटींचे मानधन घेतो. पण जाहीरातींमधून तो चांगले पैसे कमवतो. सेलिब्रिटीज नेटवर्थ वेबसाईटनुसार रणवीरकडे २४० कोटींची संपत्ती आहे.

विभाग