मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Suzlon Share Price : सरकारी घोषणेचे बाजारात सकारात्मक पडसाद; सुझलॉनच्या शेअरनं रचला इतिहास

Suzlon Share Price : सरकारी घोषणेचे बाजारात सकारात्मक पडसाद; सुझलॉनच्या शेअरनं रचला इतिहास

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 02, 2024 01:57 PM IST

Suzlon Share Price Record : अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडनं गुंतवणूकदारांना खूष करून टाकलं आहे.

Suzlon Share price
Suzlon Share price

Suzlon Share price News : गेली काही वर्षे गुंतवणूकदारांना रडवणारा सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर मागील वर्षभरापासून सुस्साट सुटला आहे. सातत्यानं वाढत असलेल्या या शेअरनं आज उच्चांक गाठत नवा इतिहास रचला. सुझलॉनचा भाव आज ५० रुपयांच्या वर गेला आहे.

गेल्या काही सत्रांमध्ये सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. काल (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर होत असताना या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं होतं. आजही चढता क्रम सुरूच राहिला. सुझलॉनच्या शेअरनं आज ५० रुपयांची पातळी ओलांडली. मागील १२ वर्षातील हा उच्चांक आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर याआधी ५ ऑगस्ट २०११ रोजी ५० रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी पुन्हा तो टप्पा गाठला आहे. एका वर्षात हा शेअर जवळपास ४५० टक्क्यांनी वाढला आहे.

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची बोट कंपनीत गुंतवणूक!

सरकारी योजनेचा परिणाम

प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत १ कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी काल केली. तसंच, या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना सौर पॅनलद्वारे दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. यामुळं प्रत्येक कुटुंबाची वर्षभरात १८ हजार रुपयांची बचत होणार आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं. या घोषणेचा थेट फायदा सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. त्याचाच परिणाम सुझलॉनच्या शेअरच्या भावावर झाला आहे.

tax demand news : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, तरीही कोट्यवधी लोकांना होणार २५ हजारांचा फायदा

कंपनीला १६० टक्के नफा

सुझलॉन एनर्जीची सध्याची कामगिरी उत्तम आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) या कंपनीचा निव्वळ नफा सुमारे १६० टक्क्यांनी वाढून २०३.०४ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच तिमाहीत कंपनीचा नफा ७८.२८ कोटी रुपये होता.

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकरी, बेरोजगार, गरीब जनतेची फसवणूक: विजय वडेट्टीवार

सुझलॉन शेअर किती रुपयांपर्यंत जाणार?

सुझलॉनच्या शेअरच्या किमतीत आणखी चढ-उताराची शक्यता आहे, असं चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले. सुझलॉनच्या शेअरची किंमत चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसते, असं त्यांनी सांगितलं. 'ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉनचे शेअर्स आहेत, त्यांनी ५४ रुपयांचं टार्गेट ठेवून वाट पाहावी, असा सल्ला JM फायनान्शियलनं दिला आहे. 

WhatsApp channel

विभाग