मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiac Signs 21 May 2023 : साथीदाराकडून योग्य साथ मिळेल, कौटुंबिक जीवन समाधानी असेल

Today Lucky Zodiac Signs 21 May 2023 : साथीदाराकडून योग्य साथ मिळेल, कौटुंबिक जीवन समाधानी असेल

May 21, 2023, 06:26 AM IST

  • Lucky Zodiacs Today : आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

आजच्या नशीबवान राशी (HT)

Lucky Zodiacs Today : आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

  • Lucky Zodiacs Today : आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज कोणत्या राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम ग्रहमान घेऊन आला आहे हे पाहूया.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : मोहिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 19, 2024 04:00 AM

Mohini Ekadashi 2024: पैसा येणार, नोकरीत पदोन्नती होणार! मोहिनी एकादशी ‘या’ राशींना लाभणार!

May 18, 2024 02:22 PM

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

वृषभ रास

जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढीस लागेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. बौद्धीक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावण्याचे योग आहेत. संतती शुभ वार्ता देतील.लेखन क्षेत्रातत असणाऱ्या व्यक्तींच्या हातुन काहीतरी चांगलं धार्मिक किंवा राजकीय लिखाण होईल. नोकरी व्यवसायात उत्तम वातावरण असेल. काही महत्वाचे प्रश्न निकाली निघतील. एकंदरीतच आज वृषभ राशीच्या व्यक्तींचं दिनमान उत्तम आहे.

शुभरंग: सफेद

कर्क रास

नव्या ओळखी फायदेशीर असतील. आज काहीतरी संशोधनात्मक काम आपल्या हातून घडू शकते.व्यवसायात चांगला फायदा होईल. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. प्रेमसंबंधात वृद्धी होईल.आज आपल्या हातून विद्यायक कार्याची मुहूर्तमेढ करू शकाल. नवीन उपक्रम हाती घ्याल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो

शुभरंग: सफेद

कुंभ रास

जोडीदाराशी थोडोफार मतभेद होतील मात्र ते फार ताणले जाणार नाहीत. आज सामाजिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. अधात्मशास्त्राकडे कल राहील. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. आज आपणास उत्तम असुन मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या.

शुभरंग: निळा

मीन रास

आज व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. व्यवहारात कल्पकता कामी येईल. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग आहेत. आपल्या बुद्धीचातुर्याने विरोधकांवर मात कराल. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. आज नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. रोजगारात नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे.

शुभरंगः केसरी

 

विभाग

पुढील बातम्या