मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mangal Gochar 2023 : मंगळाचा कर्क राशीत प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींवर काय प्रभाव टाकणार?

Mangal Gochar 2023 : मंगळाचा कर्क राशीत प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींवर काय प्रभाव टाकणार?

May 09, 2023, 12:17 PM IST

  • Mangal Rashiparvartan Negative Impact On Pisces : मंगळाचं राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना खास नुकसान देणारं ठरणार आहे. घरात कलह किंवा धनहानीसारखे प्रकार घडू शकतात. मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

मंगळाचा कर्क राशीत प्रवेश (हिंदुस्तान टाइम्स)

Mangal Rashiparvartan Negative Impact On Pisces : मंगळाचं राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना खास नुकसान देणारं ठरणार आहे. घरात कलह किंवा धनहानीसारखे प्रकार घडू शकतात. मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

  • Mangal Rashiparvartan Negative Impact On Pisces : मंगळाचं राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना खास नुकसान देणारं ठरणार आहे. घरात कलह किंवा धनहानीसारखे प्रकार घडू शकतात. मीन राशीच्या व्यक्तींनी काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक कालावधीने राशीपरिवर्तन करतात. प्रत्येक ग्रहाला आपली अशी एक विशिष्ठ चाल असते. उदाहरणार्थ सूर्य एक महिन्याने आपली राशी बदलतो. तर सर्वात मंद गतीने चालणारा शनि प्रभाव टाकण्यात मात्र सर्वात पुढे असतो. ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडतो तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : मोहिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 19, 2024 04:00 AM

Mohini Ekadashi 2024: पैसा येणार, नोकरीत पदोन्नती होणार! मोहिनी एकादशी ‘या’ राशींना लाभणार!

May 18, 2024 02:22 PM

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

येत्या १० मे २०२३ रोजी आता मंगळ कर्क राशीत प्रवेश करत आहे. मंगळाला शक्ती आणि स्फूर्ती यांचा किंवा पराक्रमाचा स्वामी म्हणून ओळखलं गेलं आहे. मंगळाची पीडा आणि शनिची साडेसाती या दोन गोष्टी व्यक्तीचा कस पाहाणाऱ्या म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.

आता मंगळ राशीपरिवर्तन करत आहे. मंगळ आता कर्क राशीत प्रवेश करत आहे. मंगळाच्या या राशीपरिवर्तनाने मेष, मिथुन, कर्क,सिंह आणि तुळ या राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलावी लागणार आहेत. १० मे ते १० जून या काळात या व्यक्तींना धनहानी किंवा नोकरी गमावणे,घरात कलह होणे, व्यापारात हानी होणे अशा संकटांना सामोरं जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे मंगळाच्या या राशीपरिवर्तनाने या राशी काहीशा बॅकफुटवर येणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

मंगळाच्या कर्क राशीत जाण्यानं मीन राशीला कशी घ्यावी लागणार काळजी

मंगळाचं हे राशीपरिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींसाठी विशेष धोकादायक असणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी कर्क राशीतील मंगळाचे संक्रमण पाचव्या घरात होणार आहे. मंगळाच्या या राशी बदलामुळे प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढेल. जोडीदाराशी वारंवार वाद आणि भांडणे होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना आव्हानांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनात मुलांबाबत थोडा तणाव जाणवू शकतो. आर्थिक दृष्ट्या पारगमन लाभदायक राहील. मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गहू अर्पण करावा, ज्यामुळे मंगळाच्या संक्रमणामुळे होणारे दुष्परिणाम कमी होऊ शकतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

 

 

 

 

 

 

विभाग

पुढील बातम्या