मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांना बढतीचे योग! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : वृषभ राशीच्या लोकांना बढतीचे योग! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 25, 2024, 09:49 PM IST

    • Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 26 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 26 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

    • Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 26 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : धृती आणि शुल योगात सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 12, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : गुरु शुक्र युती, या ४ राशीच्या लोकांसाठी अडचणीचा काळ, आर्थिक नुकसान होईल

May 11, 2024 05:59 PM

Rashi Bhavishya Today : विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 11, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : अक्षय्य तृतीयेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 10, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: एक-दोन नव्हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ५ महायोग! ‘या’ राशींना मिळणार भरपूर फायदा

May 09, 2024 05:34 PM

Rashi Bhavishya Today : वैशाख मासारंभचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 09, 2024 04:00 AM

मेषः 

आज राशीस्वामी मंगळ आणि चंद्राचा योग पाहता उद्योग व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल.

शुभरंगः नारंगी, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०१, ०८.

वृषभ: 

आज वरियान योगात खूप श्रम साफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा राहील. तापटपणा आवरावा लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल.

शुभरंग: गुलाबी, शुभदिशा: आग्नेय, शुभअंकः ०४, ०७.

मिथुनः 

आज चंद्राचा बुधाशी होणारा संयोग पाहता स्थिती लक्षात घेता स्वत:ची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम रहाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. व्यापारात लक्षपूर्वक नियोजन केल्यात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदार नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत.

शुभरंग: पोपटी, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०३, ०६.

कर्क: 

आज चंद्र राहु योगात योग तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्या साठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षा शिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाणवाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. आपल्या कामात मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ राखा.

शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य, शुभअंकः ०४, ०९.

पुढील बातम्या