मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs Today 17 April 2023 :फसव्या प्रलोभनांना भुलू नका, भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा

Lucky Zodiac Signs Today 17 April 2023 :फसव्या प्रलोभनांना भुलू नका, भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा

Apr 17, 2023, 06:25 AM IST

  • Today Lucky Zodiacs : आजचा दिवस सोमप्रदोषाचा दिवस आहे. अशात भगवान शिवशंकराच्या आशिर्वादाने आजचा दिवस काही राशींकरीता अत्यंत उत्तम असणार आहे.

आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Today Lucky Zodiacs : आजचा दिवस सोमप्रदोषाचा दिवस आहे. अशात भगवान शिवशंकराच्या आशिर्वादाने आजचा दिवस काही राशींकरीता अत्यंत उत्तम असणार आहे.

  • Today Lucky Zodiacs : आजचा दिवस सोमप्रदोषाचा दिवस आहे. अशात भगवान शिवशंकराच्या आशिर्वादाने आजचा दिवस काही राशींकरीता अत्यंत उत्तम असणार आहे.

मेष रास

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

Rashi Bhavishya Today : गंगा सप्तमीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 14, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : पुष्य नक्षत्रात आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 13, 2024 04:00 AM

दीर्घकालीन सहलीचे योग आहेत. शासकीय कामकाज मार्गी लागेल. जोडीदारासोबत मधुर वातावरण राहील. अविवाहितांचे विवाह जुळतील. व्यापाराता काही धनलाभाचे योग आल्याने मालामाल व्हाल. संतती सुख लाभेल. विरोधकांवर यशस्वीपणे मात कराल. नव्या काही योजना ऑफिसमध्ये मांडल्यास त्याचं कौतुक हौईल. वाचनाची आवड जोपासाल. घरात आनंददायी वातावरण राहील. एकंदरीत शुभ दिनमान आहे.

शुभरंग: गुलाबी 

वृषभ रास

कानी शुभवार्त पडण्याचा आजचा दिवस आहे. आज मोठे प्रकल्प मार्गी लागतील. मनाप्रमाणे गोष्टी घडल्याने दिवस आनंदी असेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. व्यापारात उत्पन्नात घसघशीत वाढ पाहायला मिळेल. काही कल्पक योजना मांडल्या जातील. विद्यार्थी वर्गाकरीता अत्यंत शुभ दिनमान आहे. मित्र परिवारही उत्तम साथ देतील. काहींना आज प्रवास करावे लागू शकतील मात्र ते प्रवास लाभकारी असणार आहेत. नोकरदारांना अत्यंत शुभ दिनमान आहे.अतिशय उत्तम दिवस आहे. सारं काही मनाजोगतं घडणारा आजचा दिवस आहे.

शुभरंग: सफेद 

मिथुन रास

अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होण्याची चिन्हं आहेत. सामाजिक गोष्टीत आनंदाने सहभागी व्हाल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर असेल. काहींना आज नोकरीत बढती मिळेल आणि बदलीही मिळेल. व्यापार करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. संशोधन करणाऱ्या व्यक्तींनाही आज यशस्वी दिनमान आहे. राजकारणात असणाऱ्या व्यक्ती आज यशस्वी ठरतील. तुमचे विरोधक नामोहरम होतील. घरासंबंधी समस्या दूर होतील. 

शुभरंग: पोपटी

कर्क रास 

व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून स्नेह मिळेल. पत प्रतिष्ठा वाढेल. मनात उत्साह राहील. मनोरंजनात वेळ घालवाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा.सामाजिक मान सन्मान मिळेल. मुलाच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कलागुणांना सिद्ध कराल. प्रवास सुखकर होतील. जोडीदार अपेश्रित साथ देईल. 

शुभरंगः पांढरा

सिंह रास

परदेश प्रवास होईल. अत्यंत लाभकारक दिवस आहे. शासकीय कामकाजात असलेल्या व्यक्तींना आज वरिष्ठांकडून चांगले बोल ऐकायला मिळतील. व्यापारात फसव्या योजनेपासून सावध राहा. भावनेच्या भरातले निर्णय टाळा. मित्र परिवार उत्तम सहकार्य करेल. आपल्या जोडीदारालला खुश 
ठेवाल. कामकाजाची शुभ रेषा आज आखाल. आरोग्य उत्तम राहील. 

शुभरंगः केसरी

 

विभाग

पुढील बातम्या