मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Janmashtami 2022 : जन्माष्टमीची पूजा करताना जवळ ठेवा कृष्णाला आवडणाऱ्या 'त्या' पाच प्रिय गोष्टी

Janmashtami 2022 : जन्माष्टमीची पूजा करताना जवळ ठेवा कृष्णाला आवडणाऱ्या 'त्या' पाच प्रिय गोष्टी

Aug 18, 2022, 07:37 AM IST

  • Shri Krishna Janmashtami 18 August 2022 : कृष्णाला अत्यंत प्रिय अशी पाच गोष्टी आहेत. या पाच गोष्टी कृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना अर्पण करा. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच कृष्णाला प्रिय असणाऱ्या गोष्टी.

श्रीकृष्ण जन्माष्टमी (हिंदुस्तान टाइम्स)

Shri Krishna Janmashtami 18 August 2022 : कृष्णाला अत्यंत प्रिय अशी पाच गोष्टी आहेत. या पाच गोष्टी कृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना अर्पण करा. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच कृष्णाला प्रिय असणाऱ्या गोष्टी.

  • Shri Krishna Janmashtami 18 August 2022 : कृष्णाला अत्यंत प्रिय अशी पाच गोष्टी आहेत. या पाच गोष्टी कृष्ण जन्माष्टमीची पूजा करताना अर्पण करा. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच कृष्णाला प्रिय असणाऱ्या गोष्टी.

आज कृष्णजन्माष्टमी आहे. देशभरात कृष्ण जन्माष्टमी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. आजच्या दिवशी कृष्णाचा जन्म होत असल्याने बाळकृष्णाला आवडणाऱ्या सर्व प्रिय गोष्टीही कृष्णासोबत ठेवल्या जातात. भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशात आणि जगात कान्हाचे भक्त जन्माष्टमी (जन्माष्टमी २०२२) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. हा पवित्र सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात आणि श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करतात. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. जाणून घ्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाच्या त्या पाच आवडत्या गोष्टी.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : मोहिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 19, 2024 04:00 AM

Mohini Ekadashi 2024: पैसा येणार, नोकरीत पदोन्नती होणार! मोहिनी एकादशी ‘या’ राशींना लाभणार!

May 18, 2024 02:22 PM

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

लोणी खडीसाखरेचा नैवेद्य

श्रीकृष्ण आणि लोणी हे समिकरणच. त्यामुळे कृष्णाला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे लोणी. त्यामुळेच आज कान्हाची पूजा करताना सोबत लोणी खडीसाखर असणं अत्यंत महत्वाचं आहे.

बासरी

ज्या बासरीच्या सुरावर कृष्णाने जगावर राज्य केलं. ज्या बासरीच्या सुरानं मंत्रमुग्ध होत गोपीका आणि गोकुळातले सर्व प्राणी कृष्णाकडे आकर्षित होत ती बासरीही श्रीकृष्णाला प्रिय आहे.

धणे 

कृष्णाचे लोणीप्रेम सर्वश्रुत असलं तरी अनेक लोकांना त्यांना ‘धणे’ हा प्रकार खूप आवडतो हे कदाचित माहिती नसावं. आज तुमच्या नैवेद्यात धण्याचा वापर नक्की करा.

वैजयंतीची फुले

मान्यतेनुसार वैजयंतीचे फूल भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय मानले जाते. अशा स्थितीत पूजेत वैजयंतीची फुले किंवा तिचा हार अर्पण करता येतो. याने कृष्णाला प्रसन्न केलं जातं.  

मोर पंख

श्रीकृष्णाच्या मुकुटात नेहमी एक मोरपंख पाहिला गेला आहे. मोराचा पंख कृष्णाची आणखी एक आवडती वस्तू आहे. त्यामुळे कृष्णाची पूजा करताना मोरपंखाचा समावेश तुमच्या पूजेच्या ताटात अवश्य करा. मोरपंख नकारात्मकता दूर करतो असंही मानलं जातं.

जन्माष्टमी शुभ मुहूर्त

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव देशभर आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा मंगळवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२२ तिथी आणि शुभ मुहूर्त

जन्माष्टमी तिथी- १८ ऑगस्ट २०२२, गुरुवार

अष्टमी तिथी आरंभ- गुरुवार १८ ऑगस्ट रात्री ९ वाजून २१ मिनिटं

अष्टमी तिथी समाप्त- शुक्रवार १९ ऑगस्ट रात्री १० वाजून ५९ मिनिटं

 

विभाग

पुढील बातम्या