मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 20 April 2024 : आज चैत्र शुक्ल द्वादशी, शनिवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 20 April 2024 : आज चैत्र शुक्ल द्वादशी, शनिवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Apr 20, 2024, 09:23 AM IST

    • Horoscope 20 April 2024 : आज २० एप्रिल २०२४ शनिवार रोजी, चैत्र शुक्ल द्वादशीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.
राशीभविष्य २० एप्रिल २०२४

Horoscope 20 April 2024 : आज २० एप्रिल २०२४ शनिवार रोजी, चैत्र शुक्ल द्वादशीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

    • Horoscope 20 April 2024 : आज २० एप्रिल २०२४ शनिवार रोजी, चैत्र शुक्ल द्वादशीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आज शनिवार २० एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल द्वादशी असून, पूर्वाफाल्गुनी नक्षत्र आणि ध्रुव योग आहे. आज चंद्र सिंह राशीत संक्रमण करणार आहे. बव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

Rashi Bhavishya Today : गंगा सप्तमीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 14, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : पुष्य नक्षत्रात आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 13, 2024 04:00 AM

मेषः 

आज मनःशांती मिळेल. धाडस दाखवा. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.

वृषभः 

आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. अशुभ घटना ऐकायला मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. 

मिथुन: 

आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मोठे व्यवहार टाळावेत.

कर्क: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. अधिक लाभ होईल. मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

सिंह: 

आज वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर मालमत्ता खरेदी करू शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. 

कन्याः 

आज मनावर संयम ठेवा. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. 

तूळ: 

आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. झोपेच्या तक्रारी राहतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण-तणावात्मक राहील. मान अपमानाचे प्रसंग घडतील. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे सांभाळा. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल.

वृश्चिक: 

आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. कामे पूर्णत्वाला न्याल. आर्थिक अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर राहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. 

धनु: 

आज घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. वाहने जपून चालवा. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. खर्चामुळे चिंतीत राहाल.

मकर: 

आज सहकार्य चांगले मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 

कुंभः 

आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

मीन: 

आज कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 

पुढील बातम्या