मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : अफाट पैसा कमावतात 'या' व्यक्ती, जगतात राजेशाही जीवन, तुमच्या हातावर आहेत ‘या’ रेषा?

Palmistry : अफाट पैसा कमावतात 'या' व्यक्ती, जगतात राजेशाही जीवन, तुमच्या हातावर आहेत ‘या’ रेषा?

Feb 24, 2023, 09:02 AM IST

  • These Poeple Live Life King Size : असा माणूस राजासारखा जगतो. यासोबतच त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते. या व्यक्तीला विलासी जीवन जगण्याची आवड असते. यासोबतच त्यांना सर्व शारीरिक सुखे मिळतात.

हस्तरेषाशास्त्र (हिंदुस्तान टाइम्स)

These Poeple Live Life King Size : असा माणूस राजासारखा जगतो. यासोबतच त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते. या व्यक्तीला विलासी जीवन जगण्याची आवड असते. यासोबतच त्यांना सर्व शारीरिक सुखे मिळतात.

  • These Poeple Live Life King Size : असा माणूस राजासारखा जगतो. यासोबतच त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते. या व्यक्तीला विलासी जीवन जगण्याची आवड असते. यासोबतच त्यांना सर्व शारीरिक सुखे मिळतात.

राशीभविष्याप्रमाणे हस्तरेषा शास्त्रही माणसाचा स्वभाव किंवा त्याच्या नशीबात काय वाढून ठेवलं आहे हे सांगण्यास पुरेसा असतो. हस्तरेषा शास्त्रात तुमच्या हातावरील रेषा किंवा तुमच्या हाताच्या तळव्यावरील उंचवटे याचा अभ्यास करतात. आज आपण हस्तरेषाशास्त्रातल्या गजलक्ष्मी योगाबद्दल बोलणार आहोत. हस्तरेषा शास्त्रानुसार श्रीमंत लोकांच्या हातात गजलक्ष्मी योग असतो. जेव्हा एखादी रेषा हातातील मणिबंधापासून सुरू होऊन शनिपर्वापर्यंत जाते, यासोबतच सूर्याचा पर्वतही वर असेल आणि मस्तकाची रेषा, आरोग्य रेषा आणि वय रेषा मजबूत असेल, तर त्या व्यक्तीच्या हातात गजलक्ष्मी योग असतो. असा माणूस राजासारखा जगतो. यासोबतच त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते. या व्यक्तीला विलासी जीवन जगण्याची आवड असते. यासोबतच त्यांना सर्व शारीरिक सुखे मिळतात.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

Rashi Bhavishya Today : गंगा सप्तमीचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 14, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : पुष्य नक्षत्रात आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 13, 2024 04:00 AM

मारुत राजयोग

हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहातावर शुक्र पर्वत आहे आणि बृहस्पति पर्वतावर क्रॉसचे चिन्ह बनलेले आहे, तसेच ज्यांच्या हातवर चंद्र पर्वताचा विकास होतो, अशा व्यक्तीच्या हातात मरुत राजयोग तयार होतो. हे लोक श्रीमंत असतात. यासोबतच त्यांच्यावर लक्ष्मी देवीची अपार कृपा असते. हे लोक आयुष्यात खूप पैसा कमावतात. तसेच, या लोकांना लहानपणापासूनच त्यांच्या क्षेत्रात चांगले यश मिळते.  त्यांच्याकडे संपत्ती आणि वैभवाची कमतरता कधीच पाहायला मिळत नाही. या प्रकारच्या हस्तरेषा असलेले लोक कुशल वक्ते आणि ज्ञानी असतात. हे लोक दान करण्यातही पुढे आहेत.

अमला राजयोग

सूर्य, चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावाने हस्तरेखात अमला योग तयार होतो. तळहातावर सूर्य, चंद्र आणि शुक्राचा पर्वत उंचावर असेल आणि त्यासोबत चंद्राच्या पर्वतापासून बुध पर्वतापर्यंत रेषा गेली असेल तर हा अमला नावाचा योग तयार होतो. असे लोक दूरदर्शी आणि कलेत जाणकार असतात. हे लोक व्यवसायात भरपूर पैसा कमावतात. या लोकांची कार्यशैली इतरांपेक्षा वेगळी असते. ज्या व्यक्तीच्या हातात हा योग असतो. त्यांचे वैवाहिक जीवनही चांगले आहे. यासोबतच त्यांना प्रेमप्रकरणातही यश मिळते.

या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

पुढील बातम्या