मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jos Buttler: कॅप्टन असावा तर असा! बटलरनं ‘या’ कारणासाठी जंगी सेलिब्रेशन थांबवलं; व्हीडिओ नीट पाहा

Jos Buttler: कॅप्टन असावा तर असा! बटलरनं ‘या’ कारणासाठी जंगी सेलिब्रेशन थांबवलं; व्हीडिओ नीट पाहा

Nov 14, 2022, 12:19 PM IST

    • Jos Buttler Champagne Celebration: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.
Jos Buttler Champagne Celebration

Jos Buttler Champagne Celebration: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.

    • Jos Buttler Champagne Celebration: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. इंग्लंड दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपद मिळवले होते.

t20 world cup 2022 final england vs pakistan mcg: इंग्लंड क्रिकेटसाठी १३ नोव्हेंबर २०२२ हा दिवस ऐतिहासिक राहिला. या दिवशी इंग्लंडने जोस बटलरच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. टी-20 वर्ल्डकप २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लिश संघाने पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव केला. सॅम करन आणि बेन स्टोक्स हे फायनलचे हिरो ठरले. सॅम करने बॉलिंगमध्ये तर बेन स्टोक्सने बॅटिंगमध्ये शानदार खेळी केली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, फायनल जिंकल्यानंतर इंग्ल्डंडच्या खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केले. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इंग्लंडचा संघ शॅम्पेन सेलिब्रेशन करताना दिसत आहे. मात्र, हे सेलिब्रेशन कर्णधार जोस बटलर थांबवताना दिसत आहे. त्याने हे शॅम्पेन सेलिब्रेशन सुरू होण्यापूर्वी मोईन अली आणि आदिल रशीद यांना मंचाच्या खाली जाण्यास सांगितले. हा प्रसंग व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. बटलरच्या या कृतीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअरही केला जात आहे.

धार्मिक कारणामुळे दारूपासून दूर राहतात अली आणि रशीद

मोईन अली आणि आदिल रशीद हे धर्माने मुस्लीम आहेत. याच धार्मिक कारणामुळे रशीद आणि मोईन अली हे दारुपासून दूर राहतात. दरम्यान, इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात लेगस्पिनरचाआदिल रशीदची भूमिका निर्णायक ठरली. त्याने फायनलमध्ये ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. रशीदने १० डॉट बॉल टाकले. 

आदिल रशीदच्या फिरकीमुळेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या सामन्यात रशीदने बाबर आझम आणि मोहम्मद हारीसची शिकार केली. तर मोईन अलीने दबावात महत्वपूर्ण १९ धावांची खेळी केली. त्याने बेन स्टोक्सवरील दबाव कमी करण्यात महत्वाची भुमिका बजावली.

पुढील बातम्या