मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 WC 2022: ICC नं निवडला वर्ल्डकपमधील सर्वोत्तम संघ, भारताच्या ३ तर पाकच्या दोघांचा समावेश

T20 WC 2022: ICC नं निवडला वर्ल्डकपमधील सर्वोत्तम संघ, भारताच्या ३ तर पाकच्या दोघांचा समावेश

Nov 14, 2022, 11:52 AM IST

    • ICC team of the tournament t20 world cup 2022: क्रिकेटच्या या मेगा इव्हेंटनंतर ICC ने टी-20 वर्ल्डकप २०२२ मधील सर्वोत्तम संघ निवडला आहे. ICC ने सोमवारी (१४ नोव्हेंबर) रोजी या संघाची घोषणा केली आहे. एकूण १२ खेळाडूंना टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश या बेस्ट टीममध्ये करण्यात आला आहे.
T20 WC 2022

ICC team of the tournament t20 world cup 2022: क्रिकेटच्या या मेगा इव्हेंटनंतर ICC ने टी-20 वर्ल्डकप २०२२ मधील सर्वोत्तम संघ निवडला आहे. ICC ने सोमवारी (१४ नोव्हेंबर) रोजी या संघाची घोषणा केली आहे. एकूण १२ खेळाडूंना टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश या बेस्ट टीममध्ये करण्यात आला आहे.

    • ICC team of the tournament t20 world cup 2022: क्रिकेटच्या या मेगा इव्हेंटनंतर ICC ने टी-20 वर्ल्डकप २०२२ मधील सर्वोत्तम संघ निवडला आहे. ICC ने सोमवारी (१४ नोव्हेंबर) रोजी या संघाची घोषणा केली आहे. एकूण १२ खेळाडूंना टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश या बेस्ट टीममध्ये करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचा समारोप झाला आहे. १३ नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला . तर पाकिस्तानचे दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्रिकेटच्या या मेगा इव्हेंटनंतर ICC ने टी-20 वर्ल्डकप २०२२ मधील सर्वोत्तम संघ निवडला आहे. ICC ने सोमवारी (१४ नोव्हेंबर) रोजी या संघाची घोषणा केली आहे. एकूण १२ खेळाडूंना टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान मिळाले आहे. यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश या बेस्ट टीममध्ये करण्यात आला आहे. सोबत टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानचे दोन, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आफ्रिकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश झाला आहे.

ICC चा सर्वोत्तम संघ पुढीलप्रमाणे

ICC ने या संघाचे सलामीवीर म्हणून इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांची निवड केली आहे. या संघाची धुरादेखील जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला स्थान मिळाले आहे. तसेच, पाचव्या क्रमांकावरील फलंदाद म्हणून न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला स्थान मिळाले आहे. विराटने स्पर्धेत ४ अर्धशतके ठोकली आहेत. तर ग्लेन फिलिप्सने एक शतक आणि एका अर्धशतकासह स्पर्धेत २०१ धावा ठोकल्या आहेत.

सहाव्या क्रमाकावर ICC ने झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाची निवड केली आहे. सिकंदर रझाने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच, सातव्या क्रमांकावर आणखी एक ऑलराऊंडर पाकिस्तानच्या शादाब खानची निवड झाली आहे. शादाबने या स्पर्धेत बॅटिंग आणि बॉलिंगने चांगलाच प्रभाव पाडला आहे. तर आठव्या क्रमांकावर इंग्लंडचा सॅम करन आहे. सॅम करन या वर्ल्डकपचा मॅन ऑफ द टुर्नामेंटदेखील आहे. त्यानंतर ९व्या क्रमांकावर आफ्रिकेचा अॅनरिक नॉर्खिया आणि १० व्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड आहे. मार्क वूडने संपूर्ण स्पर्धेत १५० च्या स्पीडने गोलंदाजी केली आहे. त्यानंतर ११ व्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदि आहे. १२ वा खेळाडू म्हणून भारताच्या हार्दिक पांड्याची निवड झाली आहे.

ICC ची टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये

जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर) (इंग्लंड)

एलेक्स हेल्स (इंग्लंड)

विराट कोहली (भारत)

सूर्यकुमार यादव (भारत)

ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड)

सिकंदर रजा (झिम्बाब्वे)

शादाब खान (पाकिस्तान)

सैम करन (इंग्लंड)

एनरिक नोर्त्जे (साउथ अफ्रीका)

मार्क वुड (इंग्लंड)

शाहीन अफरीदी (पाकिस्तान)

१२वा खेळाडू- हार्दिक पांड्या (भारत)

पुढील बातम्या